Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र तेलंगाणा, झारखंडचे सरकार भविष्यात असेच भरडले जाईल, रोखठोकमधून राऊतांची केंद्रावर टीका

तेलंगाणा, झारखंडचे सरकार भविष्यात असेच भरडले जाईल, रोखठोकमधून राऊतांची केंद्रावर टीका

Subscribe

शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या रोखठोक या सदरातून शेवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटावर टीका केली आहे. रोखठोक – महाराष्ट्रात राजकीय पेच, कायद्याच्या कचाट्यात लोकशाही!, अशा मथळ्या खाली हा लेख छापण्यात आला आहे. यात महाराष्ट्राच्या विधानसभेतील जे सदस्य शिवसेनेतून बाहेर पडले त्यांचा युक्तिवाद एकच आहे तो म्हणजे, आमचीच शिवसेना खरी. आम्ही शिवसेना सोडली नाही! त्यांची ही भूमिका कातडी वाचविण्याची आहे, अशी टीका सामनाच्या रोखठोक सदरातून करण्यात आली आहे. यात पुढे घटना ही शेवटी माणसांसाठी असते. माणसे घटनेसाठी नसतात. घटनेतील 10 व्या शेडय़ुलनुसार 16 फुटीर आमदार सरळ अपात्र ठरतील. सरकारला वाचविण्यासाठी व शिवसेनेला कायमचे संपवून टाकण्यासाठी 16 अपात्र आमदारांना पेंद्र सरकारात बसलेले लोक वाचवीत आहेत, पण सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ काय निर्णय घेते यावर आता देशाचे व लोकशाहीचे भवितव्य अवलंबून आहे, असे रोखठोक सदरात म्हटले आहे.

लोकशाहीचे भवितव्य – 

- Advertisement -

रोख ठोकमध्ये पुढे हिंदुस्थानातील लोकशाहीचे भवितव्य कसे अंधकारमय झाले आहे त्याचे प्रत्यंतर रोजच येत आहे. देशाचे सरन्यायाधीश श्री. रमण्णा यांनी जयपूरमधील एका कार्यक्रमात लोकशाही व संसदेच्या भवितव्यावर चिंता व्यक्त केली. विरोधी पक्षांची जागाही सत्ताधाऱयांनी बळकावयाची हे चित्र घातक आहे, असे सरन्यायाधीश रमण्णा जेव्हा जाहीरपणे सांगतात तेव्हा भीती वाटू लागते. पण एकाधिकारशाही व हुकूमशाहीचे कितीही तांडव झाले तरी लोकशाही या देशात मरणार नाही, असे म्हंटले आहे.

लोखशाही जिवंत, पण ती कुणाची तरी बटीक –

- Advertisement -

पुढे रोखठोकमध्ये महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाने लोकशाहीची मूल्ये उद्ध्वस्त केली हे पेंद्रातील राज्यकर्ते मानायला तयार नाहीत. आमदारांना पह्डले व खासदारही पह्डले. उद्धव ठाकरे यांनी मोदी-शहांच्या विरोधात जाऊन सरकार स्थापन केले. त्याचा बदला शेवटी शिवसेना पह्डून घेतला गेला. तेलंगणाचे के. सी. चंद्रशेखर राव व झारखंडचे हेमंत सोरेन यांची सरकारे भविष्यात याच पद्धतीने भरडली जातील. सोरेन यांच्या निकटवर्तीयांवर पेंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडू लागल्या आहेत. त्याच वेळी ज्यांच्यावर पेंद्रीय यंत्रणांचे खटले होते अशा शिवसेनेतील फुटीर आमदार-खासदारांना सर्व जाचांतून मुक्त केले. आता त्यांना शांत झोप लागेल. ईडी, सीबीआय त्यांच्या दारात जाणार नाही. समान न्यायाचे तत्त्व किती चुकीच्या पद्धतीने राबवले जात आहे ते स्पष्ट दिसते. भारतीय लोकशाही जिवंत आहे, पण ती कुणाची तरी आज बटीक आहे, अशी टीका केली आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -