घरदेश-विदेशनव्या संसद भवनावरून संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका, उद्घाटनच्या कार्यक्रमावर टाकणार बहिष्कार

नव्या संसद भवनावरून संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका, उद्घाटनच्या कार्यक्रमावर टाकणार बहिष्कार

Subscribe

नवी दिल्लीतील सेन्ट्रल व्हिस्टा विकास प्रकल्पांतर्गत नव्या संसद भवनाच्या इमारतीचे येत्या 28 मेला उद्घाटन होणार आहे. यासाठी भव्य अशा उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पण या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते असलेले संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेल्या नव्या संसद भवनाचे म्हणजेच आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असणाऱ्या नवी दिल्लीतील सेन्ट्रल व्हिस्टा विकास प्रकल्पांतर्गत नव्या संसद भवनाच्या इमारतीचे येत्या 28 मेला उद्घाटन होणार आहे. यासाठी भव्य अशा उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पण या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते असलेले संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. (Sanjay Raut’s criticism of the central government from the new parliament building)

अर्ध्या दिल्लीवर बुल्डोजर फिरवून नव्या संसद भवनाची खरच गरज होती का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तर देशातील सर्वोच्च पदावर असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना संसदेच्या कार्यक्रमातून डावलण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेससहित सर्व विरोधी पक्ष हे नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला बहिष्कार टाकणार असल्याचे संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Ajit Pawar : अजित पवार यांच्याकडे आहे स्टॅम्प पेपरचा गठ्ठा! कारण…

आज (ता. 24 मे) घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, सेंट्रल व्हिस्टा हा जो एक प्रकल्प कोरोना काळात सुद्धा देशाच्या तिजोरीवर लाखो कोटी रुपयांचा जो भार टाकण्यात आला, त्याची खरच गरज होती का? फक्त प्रधानमंत्र्यांची इच्छा आहे, म्हणून अर्ध्या दिल्लीवर बुल्डोजर फिरवून हा प्रकल्प उभा केला. सध्याच्या दिल्लीच्या अनेक इमारतीत उद्घाटक म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या नावाच्या पाट्या आहेत. फक्त त्या नावाच्या पाट्या उखडून इनॉग्रेटेड बाय नरेंद्र मोदी म्हणून हे जर काम केलं असेल तर देशाच्या इतिहासातील नावे अशा प्रकारे पुसली जाणार नाहीत, असे राऊत यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

हिंदुस्तानची संसद सध्याची इमारत ही क्रांतिकारक आणि ऐतिहासिक आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा मसुदा, घटनेचा मसुदा याच ऐतिहासिक इमारतीतून लिहिला गेला. नवीन सरकार, पहिलं सरकार याच इमारतीतून स्थापन झालं. अनेक क्रांतिकारकांच्या, स्वातंत्र्य सैनिकांच्या पदस्पर्शाने ही इमारत पावन झाली. अनेक ऐतिहासिक घटना या इमारतीत घडल्या आहेत. ही इमारत अजून 100 वर्षे चालली असती. कारण यापेक्षाही ऐतिहासिक, जुन्या इमारती जगभरात आहेत. त्या सगळ्यांपेक्षा या आपली इमारत ही नवीन आहे. तरीही नवी इमारत त्यांनी बांधली, असे म्हणत संजय राऊत यांनी संसद भवनाच्या नव्या इमारतीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला.

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला विरोधी पक्ष टाकणा बहिष्कार
28 मे रोजी नव्या संसद भवनाचा जो सोहळा होणार आहे त्या सोहळ्यावर काँग्रेससह आमचा बहिष्कार आहे. एका आदिवासी राष्ट्रपती महिलेला डावललं आहे त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. रामनाथ कोविंद हे द्रौपदी मुर्मूंच्या आधी राष्ट्रपती होते त्यांना काय अधिकार दिले गेले? द्रौपदी मुर्मू आदिवासी महिला आहेत आम्ही त्यांना राष्ट्रपती केलं असं छातीठोकपणे मोदी आणि भाजपाचे नेते सांगत होते. आता त्यांना नव्या संसदेच्या उद्घाटनाचा सन्मान का देत नाही? या दोघांची अवस्था रबर स्टँपसारखी करण्यात आली आहे.

राष्ट्रपती भवनाच्या समोर नवं संसद भवन आहे. त्या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना निमंत्रण नाही. ही नेमकी कुठली लोकशाही आहे? असे म्हणत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना या कार्यक्रमातून डावलणे हा फक्त आदिवासी समाजाचाच नाही तर संविधानाचा अपमान आहे, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -