Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी "आम्ही सांगू तीच लोकशाही असे केंद्राचं धोरण", संजय राऊत यांची केंद्र सरकारवर...

“आम्ही सांगू तीच लोकशाही असे केंद्राचं धोरण”, संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका

विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची चमचेगिरी करावी ही अपेक्षा असेल तर ते चालणार नाही.

Related Story

- Advertisement -

आम्ही सांगू तेच ऐका, आम्ही सांगू तीच लोकशाही अशा धोरणानुसार केंद्र सरकारला संसदेत चर्चा हवी आहे. मात्र विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची चमचेगिरी करावी ही अपेक्षा असेल तर ते चालणार नाही. अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारव केली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी महागाई, इंधन दरवाढ, शेतकरी विषय आणि राष्ट्रीय सुरक्षा व हेरगिरी यावर चर्चा करण्याची मागणी केली आहे. परंतू यावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार तयार नाही यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक गदारोळ करत आहेत. मात्र आम्ही सांगू तीच लोकशाही असे केंद्राचे धोरण असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. आज सर्वोच्च न्यायालयात पेगॅसस प्रकरणात सुनावणी आहे. यावर संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, आम्हाला खात्री आहे जे आम्हाला सगळ्यांना म्हणायचे आहे. तीच भूमिका सगळे प्रमुख पत्रकार आमच्या वतीने न्यायालयात मांडतील आमची साधी मागणी आहे की, याबाबात चर्चा करावी. हेरगिरीच्या प्रकरणाबाबत देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे. जर सरकार पक्ष हा अधिकार नाकारत असेल तर त्यांनी स्पष्ट सांगावे या देशातील लोकशाही आम्ही मोडून काढली आहे. असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

चमचेगिरी करावी अशी अपेक्षा…

- Advertisement -

या देशात लोकशाही, संसदीय लोकशाही, संसद या संस्था आम्ही शिल्लक ठेवल्या नाहीत. तुम्ही शेतकऱ्यांवर बोलायला तयार नाही, महागाईवर बोलायला तयार नाही, हेरगिरीवर बोलायला तयार नाही. मग केंद्र सरकार कोणत्या विषयावर बोलायला तयार आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची चमचेगिरी करावी ही अपेक्षा असेल तर ते चालणार नाही. विरोधी पक्षाने सरकारने हातात घालून देशाचे काम करावं अशी आमची भूमिका आहे. अनेक प्रश्नांवर एकत्र येणं गरजेचे आहे. विशेषता राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर पेगॅसस हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आम्ही सांगू तिच लोकशाही

गेल्या अनेक महिन्यांपासून हजारो शेतकरी गाझीपुरच्या बॉर्डरवर बसले आहेत तो सुद्धा मुद्दा राष्ट्रीय आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या दारात उभं राहून न्याय मागण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सरकार सर्व मुद्द्यावर बोलायला तयार आहेत. पण आम्ही सांगु तेच बोला आम्ही सांगू तेच ऐका आम्ही सांगू तीच लोकशाही अशा धोरणानुसार चर्चा करा अशी सरकारची भूमिका आहे. हा १२५ कोटीचा देश आहे. या देशाने स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी अनेक लढाया लढल्या आहेत. ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर अशा प्रकारे हल्ले केले आहेत. ते राजकारणातून संपले आहेत हा देशाचा इतिहास असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. सरकार कोणत्या विषयावर बोलायला तयार नाही. सरकारला विरोधकांचा आवाज ऐकण्याची इच्छा नसल्याचेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधींनी फोटो काढण्यासाठी पत्र

- Advertisement -

दिल्लीत एका ९ वर्षीय दलीत मुलीवर बलात्कार झाला हा अत्यंत गंभीर विषय आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो. आणि विरोधी पक्षातीस सर्व नेते पिडीतेच्या कुटुंबीयांच्या भेटीला जातात हे सुद्धा केंद्र सरकारला आवडलेलं नाही आहे. भाजपने यावर प्रतिक्रिया दिली आहे. या बलात्काराच्या बाबत भाजपकडून असे उत्तर आलंय की काँग्रेसच्या राज्यात बलात्कार होत नाही का? म्हणजे काँग्रेसच्या राज्यात बलात्कार होत असतील तर तुमच्या राज्यातील बलात्कार माफ करायचे का? तसेच राहुल गांधी यांनी मृत मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक फोटो टाकला आहे. तो फोटो काढावा यासाठी राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने ट्विटरल इंडियाला पत्र लिहिलं आहे. हा काय प्रकार आहे. हि तर हुकुमशाही झाली. तुम्ही त्या कुटुंबाचे सांत्वन करत आहेत याबाबतची माहिती देशाच्या जनतेला दिली तर अशा प्रकारे गळचेपी करत आहात का? नरेंद्र मोदी हे निर्भयाच्या कुटुंबाला भेटायला गेले होते. तेव्हा अनेक फोटो प्रसिद्ध झाले होते. तेव्हा ते फोटो काढा अस बाल संरक्षण आयोगाने लिहिल्याचे आठवत नाही अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

- Advertisement -