Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान, तुम्ही क्रांती केली असेल तर...

संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान, तुम्ही क्रांती केली असेल तर…

Subscribe

Sanjay Raut Challenges to Eknath Shinde | जे आवाज उठवतील, विरोधात बोलतील त्यांना न्यायालय आणि तपास यंत्रणाच्या माध्यमातून नष्ट करायचं. अशापद्धतीचं दळभद्री राजकारण सुरू आहे," असं म्हणत संजय राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

Sanjay Raut Challenges to Eknath Shinde | मुंबई – राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यांवरून काल, शुक्रवारी सभागृहात खडाजंगी झाली. राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन झाल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार हल्ला केला. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी विरोधकांवर टीका करताना आम्हालाही तुम्ही मिंधे, चोर, खोके म्हणून संबोधले होते, असं एकनाथ शिंदे म्हणाले. या सर्व प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर आगपाखड केली आहे. संजय राऊत आज मालेगावातून प्रसार माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – राहुल गांधी हे अहंकारी…, भाजपा नेते निलेश राणे यांचे टीकास्त्र

- Advertisement -

“तुम्ही क्रांती किंवा बंड केलं असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा मग कळेल खरी शिवसेना कोणती आणि कोणती खोटी हे कळेल,” असं संजय राऊत म्हणाले. निवडणूक आयोगाच्या हातात हात घालून तुम्ही शिवसेना चोरली असे टीकास्त्रही संजय राऊतांनी डागलं. देशात लोकशाही अजिबात राहिलेली नाही. विरोधी पक्षाला अजिबात स्थान मिळू द्यायचं नाही. लोकशाही नष्ट करायची. जे आवाज उठवतील, विरोधात बोलतील त्यांना न्यायालय आणि तपास यंत्रणाच्या माध्यमातून नष्ट करायचं. अशापद्धतीचं दळभद्री राजकारण सुरू आहे,” असं म्हणत संजय राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

हेही वाचा – ही ‘नेतान्याहू पॅटर्न’ लागू करण्याची सुरुवात…, ठाकरे गटाची केंद्रावर आगपाखड

- Advertisement -

अनेक लोक झुकत नाहीत, वाकत नाहीत आणि गुडघेही टेकत नाही. राहुल गांधीही या परिस्थितीला सामोरे जात आहेत. त्यांनी जुलमी सरकारपुढे झुकण्यास नकार दिला आणि लोकसभेचे सदस्यत्व गमावलं, असं म्हणत संजय राऊतांनी राहुल गांधींना समर्थन केलं आहे. तसंच, चोरमंडळ घालवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. मालेगावातून याची सुरुवात होईल, असंही संजय राऊत म्हणाले. उद्या मालेगावात ठाकरे गटाची जाहीर सभा आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेविषयीही संजय राऊतांनी या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी, राजकीय परिस्थितीवरील त्यांचं भाष्य ऐकण्यासाठी जनता उत्सुक आहे. मालेगावात लोकांचा उत्साह आणि प्रतिसाद दिसतोय. ही खरी शिवसेना आहे. त्या शिवसेनेचं स्वरुप आणि रुप मालेगावातील जनतेला पाहाता येईल. ठाकरे आणि रश्मी ठाकरे उद्या पाच वाजता मालेगावात येतील, शिवसेनेचे सर्व नेते उद्यापर्यंत पोहोचतली, पदाधिकारी पोहोचले आहेत. सभा उत्तर महाराष्ट्रात असली तरीही ती सभा संपूर्ण महाराष्ट्राची असेल, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -