घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमालेगावात भुसे समर्थकांकडून संजय राऊत यांच्या पुतळयाचे दहन

मालेगावात भुसे समर्थकांकडून संजय राऊत यांच्या पुतळयाचे दहन

Subscribe

नाशिक : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गिरणा शुगर शेअर विक्री प्रकरणात राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर केलेल्या आरोपाचे पडसाद आज विधानसभेपाठोपाठ मालेगाव शहरात देखील उमटल्याचे पाहायला मिळाले. राऊत यांच्या आरोपानंतर मालेगाव येथे भुसे समर्थकांनी संजय राऊत यांच्या पुतळयाचे दहन करत निषेध नोंदवला.

संजय राऊत यांनी शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या गिरणा अ‍ॅग्रो कंपनीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय, शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत.गिरणा अ‍ॅग्रो नावाने178 कोटी 25 लाखांचे शेअर्स शेतकर्‍याकडून गोळा केले.पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे.लवकरच स्फोट होईल असे राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटलयं. त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाचे संतप्त पडसाद मंगळवारी मालेगाव शहरात उमटले असून शिवसेनेच्या संतप्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोसम पुलावर राऊत यांचा निषेध केला. तसेच राऊतांच्या पुतळ्यास जोडे मारत त्याचे दहन केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

- Advertisement -
काय आहे वाद ?

मंत्री दादा भुसे यांनी गिरणा सहकारी कारखान्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावरून भुसे आणि राऊत यांच्यात जुंपली आहे. दादा भुसे यांनी देखील संजय राऊत यांच्यावर टीका करताना ‘चाकरी मातोश्रीची आणि भाकरी पवारांची खातात” असे म्हंटले. यावरून राष्ट्रवादी कॉँग्रेस विधानसभेत आक्रमक झाल्याचे दिसून आले. शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप यावेळी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केला आहे. त्याबाबत उत्तर देताना शरद पवारांबद्दल आदरच असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -