मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था नेमक्या कधी होणार? याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नसली तरी सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली असून आता सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता नेमके कोण कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु आता ठाकरे गटाचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत हे ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतची स्पष्टीकरण राऊतांकडून देण्यात आले आहे. (Sanjay Raut’s explanation about contesting elections from North East MumbaiSanjay Raut’s explanation about contesting elections from North East Mumbai ppk)
हेही वाचा – “सत्तेसाठी निष्ठा विकून खाल्ली…” दिलीप वळसे-पाटील यांच्या वक्तव्याचा जितेंद्र आव्हाडांनी घेतला समाचार
ईशान्य मुंबईतून निवडणूक लढविण्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर याबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, पक्षाने आदेश दिला तर मी तुरुंगातही जातो. पक्षाने आदेश दिला तर आम्ही काहीही करतो. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले लोक आहोत. पक्षाची गरज, पक्षाचा आदेश, पक्ष प्रमुखांचा आदेश जो असेल ते मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. माझे कुटुंबही तेच आदेश मानणाऱ्यांपैकी आहेत. त्यामुळे वृत्तपत्रात काही बातम्या आलेल्या आहेत. त्यांनीच मला प्रश्न विचारला होता की, तुम्ही निवडणूक लढवणार का, त्यावेळी मी त्यांनी सांगितले की पक्षाने आदेश दिला तर मी काहीही करेल.
परंतु, ईशान्य मुंबईतून संजय राऊत सोडून द्या. आमचा साधा शिवसैनिक जरी या निवडणुकीला उभा राहिला तरी तो किमान तो दोन ते सव्वा दोन लाख मतांनी विजयी होईल, असा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. ईशान्य मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तिथे सातत्याने शिवसेनेच्या मदतीने, सहकाऱ्याने भाजपचे खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे त्या मतदारसंघातून आमचा कोणताही साधा कार्यकर्ता जरी उभा राहिला तरी तिथून ती व्यक्ती निवडून येईल, असे स्पष्ट मत संजय राऊत यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे.
आजच्या (ता. 21 ऑगस्ट) पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर आणि पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर भाष्य केले. पण त्यांनी निवडणुकीबाबत केलेल्या खुलाशावर आता अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण संजय राऊत यांनी अद्याप एकदाही कोणतीही निवडणूक लढविलेली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये जर का निवडणूक लढवली तर ते निवडून येतात की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.