घरमहाराष्ट्रशिंदे गटाने कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, सरकार कोणाचं...

शिंदे गटाने कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, सरकार कोणाचं…

Subscribe

शिवसेना भवनात आज उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांची बैठक आयोजित केली. त्यावेळी संजय राऊतही उपस्थित होते. शिवसेना भवनात जाण्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुंबई – शिवसेना आणि धनुष्यबाणावर ताबा मिळवल्यानंतर शिंदे गटाने विधिमंडळातील शिवसेना कार्यालयावरही ताबा मिळवला आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांच्यावर टीका केली. शिंदे गटाने सरकारी कार्यालयांवर ताबा मिळवला आहे. सध्या त्यांचं सरकार असून पुढच्यावेळेस त्यांचं सरकार असेल की नाही याची खात्री नाही, असं संजय राऊत म्हणाले. शिवसेना भवनात आज उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांची बैठक आयोजित केली. त्यावेळी संजय राऊतही उपस्थित होते. शिवसेना भवनात जाण्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा  मोठी बातमी! शिवसेना आणि धनुष्यबाण घेतल्यानंतर विधिमंडळातील कार्यालयावरही शिंदे गटाचा कब्जा

- Advertisement -

विधिमंडळातील कार्यालय ताब्यात घेतल्यामुळे संजय राऊत म्हणाले की, ही चोरांची शिरजोरी आहे. त्यांना समोरून लढता येत नाही. तपास यंत्रणा, निवडणूक आयोगाकडून हवे तसे निकाल मिळवायचे आणि ताबा घ्यायचा, हेच सध्या सुरू आहे. हातात यंत्रणा असल्याने त्यांना त्यांच्या महाशक्तीचा पाठिंबा आहे. विधिमंडळाचा ताबा, शिवालयाचा ताबा ही सर्व लढाई औटघटकेची आहे. या राज्यातील जनता, कडवट निष्ठावंत शिवसैनिक आजही बाळासाहेबांच्या वास्तुशी इमान राखून आहेत. ताब्यात घेतलेल्या दोन्ही वास्तू सरकारी होत्या. सरकारकडून मिळालेल्या वास्तू होत्या. सरकार त्यांचं आहे. आज त्यांचं आहे, उद्या त्यांचं असेल याची खात्री नाही. सरकार कोणाचं ठेवायचं हे जनता ठरवते, असंही ते म्हणाले.

हेही वाचा – तातडीच्या सुनावणीसाठी उद्या या, सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे गटाला सल्ला

- Advertisement -

दरम्यान, संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यासंदर्भात त्यांच्याविरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यावरून त्यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘माझ्यावर आतापर्यंत ३५ गुन्हे दाखल झाले आहेत. १ लाख गुन्हे दाखल झाले तरी संजय राऊत मागे हटणार नाही.’


कार्यालयाचा ताबा नाही, कार्यालयात प्रवेश

“आम्ही विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेतलेला नसून कार्यालयात प्रवेश केला आहे. त्यासाठी आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. हे शिवसेना पक्षाचं कार्यालय आहे आणि आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही तयारी केली आहे. कार्यालय ताब्यात घेण्यासाठी आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया भरत गोगावले यांनी पूर्ण केली आहे,” अशी प्रतिक्रिया आमदार सदा सरवणकर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -