घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसंजय राऊतांचे क्रिकेट मैदानात चौकार, षटकार

संजय राऊतांचे क्रिकेट मैदानात चौकार, षटकार

Subscribe

नविन नाशिक : राजकारणात चौफेर फटकेबाजी करणार्‍या खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी नाशिक दौरयात हाती बॅट घेत क्रिकेटच्या मैदानावरही फटकेबाजी केल्याचे बघायला मिळाले. नविन नाशिक येथील संभाजी स्टेडियमवर आयोजीत क्रिकेट स्पर्धांचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राऊत यांनी उदघाटन केल्यानंतर क्रिकेट खेळण्याचा मोह त्यांना आवरला नाही. राऊत यांनी बॅट हाती घेत क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली.

शिवसेनेचे नेते तथा उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख संजय राऊत हे नाशिक दौर्‍यावर आले असून नाराज असलेल्या पदाधिकार्‍यांची नाराजी दूर करण्यासाठी विशेष संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. दौर्‍याच्या सुरवातीलाच त्यांनी क्रिकेटच्या मैदानात उतरत गोलंदाजास धु धु धुतले. यावेळी पदाधिकार्‍यांनी देखील टाळ्यांची बरसात केली. सामनाच्या अग्रलेखातून किंवा आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विरोधकांना ते चांगलेच फटकारे लगावत असतात. आज ते खर्‍याखुर्‍या क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरल्याचे पाहायला मिळाले. राजकारणात शब्दांची फटकेबाजी करणे हे कौशल्य असते आणि शब्दांची फटकेबाजी संजय राऊत कायम करत असतात. आणि बॅट आणि बॉल सोबत खरी खरी फटकेबाजी संजय राऊतनी केल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -