घरदेश-विदेशतामिळनाडू आणि पुदुच्चेरी वगळता इतर कुठेही सत्ताबदल नाही - राऊत

तामिळनाडू आणि पुदुच्चेरी वगळता इतर कुठेही सत्ताबदल नाही – राऊत

Subscribe

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आज लागणार असून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, यावर भाष्य करताना तामिळनाडू आणि पुदुच्चेरी वगळता इतर कुठेही सत्ताबदल होणार नाही, असा दावा शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे. तसंच बंगालमध्ये ममता बॅनर्जीच निवडून येणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. गृहमंत्र्यांनी कितीही सभा घेतल्यातरीही विजय हा तृणमूलचाच होणार असं राऊत म्हणाले.

तामिळनाडू आणि पुद्दुचेरी वगळता कोणत्याही राज्यात सत्तापरिवर्तन होणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सत्ता बनवणार असा विश्वास संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. चर्चा काहीही होऊ द्या ममताच जिंकणार असून त्यांचा पराभव करणं शक्य नसल्याचं संजय राऊत म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच सरकार बनवेल. केरळमध्येही सत्तापरिवर्तन होणार नाही. नंदीग्रामबाबत चर्चा काहीही होऊ देत, पण ममतादीदींचं धैर्य मानायलाच हवं. त्या दोन जागांवर लढल्या नाहीत. त्या एकाच जागेवर लढल्या. त्यांनी आव्हान स्वीकारलं. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींना हरवणं सोपं नाही. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचंच सरकार येणार, असं राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -

भाजपाचे आकडे वाढतील पण बंगालमध्ये सत्ता नाही

भाजपनं केलेल्या व्यवस्थापनाचं कौतुक केलंच पाहिजे. त्यांनी प्रचंड मेहनत केली. देशभरातून लोकं आणली. देशाचे पंतप्रधान कोरोनाच्या संकटकाळात देखील तिथे तंबू ठोकून बसले होते. राज्याराज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नेऊन बसवले. पण पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना हरवणं इतकं सोपं नाही. त्यांचा बहुमताचा आकडा कमी होईल कदाचित. पण निकाल हाती येतील, तेव्हा तृणमूल काँग्रेसचंच सरकार तिथे आलेलं असेल. भाजपचे आकडे नक्कीच वाढत आहेत. लोकसभेतही वाढले आहेत. त्यांची मेहनतही आहे, गुंतवणूकही आहे, सगळंच आहे, असं राऊत म्हणाले.

देशात कोरोना रुग्ण वाढले, केंद्राने चिंतन करावं

निवडणुकीचं हे वातावरण दुपारपर्यंत संपून जाईल. देशभरात आजही सर्वात मोठं संकट हे कोरोनाचं आहे. देशात कुणीही कोरोनाच्या संकटात निवडणुकीवर लक्ष देत नाही आहे. आम्हाला चिंता कुणाच्या राजकीय आकड्यांच्या वाढीपेक्षा करोनाच्या वाढीची आहे. देशात कोरोना रुग्ण वाढले, केंद्राने आता चिंतन करावं, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – West Bengal Assembly Election 2021 Result Live Updates 


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -