मुख्यमंत्र्यांच्या देशद्रोह्यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचे उत्तर, ‘आम्ही सुद्धा ४० गद्दारांना…’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांनी केलेल्या देशद्रोही या वक्तव्याचा खुलासा केल्यानंतर आता संजय राऊत यांनी देखील त्यांनी केलेल्या चोरमंडळ या वक्तव्याबाबत बोलत टोला लगावला आहे. याबाबतचे संजय राऊत यांच्याकडून एक ट्विट करण्यात आले आहे.

Sanjay Raut's reply on CM's statement of traitors

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांनी केलेल्या देशद्रोही या वक्तव्याचा खुलासा केल्यानंतर आता संजय राऊत यांनी देखील त्यांनी केलेल्या चोरमंडळ या वक्तव्याबाबत बोलत टोला लगावला आहे. याबाबतचे संजय राऊत यांच्याकडून एक ट्विट करण्यात आले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये हक्कभंगाच्या प्रस्तावावरून बराच गदारोळ झालेला पाहायला मिळाला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना हे विधिमंडळ नाही तर चोरमंडळ आहे, असे वक्तव्य केले होते. तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्याआधी चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून बहिष्कार टाकण्यात आला होता. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी बरं झालं देशद्रोह्यांसोबतचे चहापान टळले, असे वक्तव्य केले होते. या दोन्ही वक्तव्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याची मागणी केली होती. परंतु याबाबत आता मुख्यमंत्र्यांनी वक्तव्याचा खुलासा केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्याचा खुलासा केला असला तरी, संजय राऊत यांच्याकडून यावर खोचक शब्दात टीका करण्यात आली आहे. राऊतांनी शिंदेंच्या खुलाश्यावर खोचक टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुलाशाबाबतीतल्या एका ट्विटला रिट्विट करत संजय राऊत म्हणाले की, “बरं….मग आम्ही सुद्धा 40 गद्दार आमदारांना विधिमंडळातले चोर मंडळ म्हणालो.. स्पष्ट आहे. जय महाराष्ट्र!” असा टोला राऊतांनी ट्विटच्यामाध्यमातून लगावला आहे.

जो हक्कभंग विरोधी पक्षाकडून देण्यात आला आहे, त्या संदर्भात माझं वक्तव्य नाही. माझं वक्तव्य अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्याविरोधातील नव्हतं, तर माझं वक्तव्य हे नवाब मलिक यांच्याविरोधातील होतं. देशद्रोही दाऊद इब्राहिम आणि हसीना पारकर यांच्याबाबत होत.” असे खुलासा मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानपरिषदेतील सभागृहात करत या प्रकरणाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्री पलटले; “मला तुम्हाला देशद्रोही म्हणायचे नव्हते, तर…”

दरम्यान, हक्कभंगाच्या बाबतीतली प्रकरणे समोर आल्यानंतर या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक समिती स्थापन केली आहे. १५ सदस्य असलेल्या या समितीमध्ये ठाकरे गटातील एकही आमदाराचा समावेश करण्यात आलेला नाही. तर समितीच्या अध्यक्षपदी दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांची नेमणूक करण्यात आली आहे.