Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी युतीमध्ये शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली, संजय राऊतांचं खळबळजनक वक्तव्य

युतीमध्ये शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली, संजय राऊतांचं खळबळजनक वक्तव्य

शरद पवार- प्रशांत किशोर भेट मोठी उलथापालथ करणार

Related Story

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली असल्याच खळबळजनक दावा शिवेसना नेते आणि खसादार संजय राऊत यांनी केला आहे. जळगाव दौऱ्या दरम्यान संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहेत. तसेच आता महाविकास आघाडीमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा सूर उमटत आहे. युती सरकारमध्ये असताना शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली आहे. शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न झाला असल्याचाही आरोप यावेळी संजय राऊत यांनी केला आहे. या आरोपांवर भाजप नेत्यांकडून काय प्रत्युत्तर येतंय याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत जळगाव दौऱ्यावर आहेत. जळगावमध्ये शिवसेना मेळाव्यात संभोधित करताना संजय राऊत यांनी भाजपवर आरोप केला आहे. राज्यात भाजप – शिवसेना युतीचं सरकार होते. तेव्हा देवेद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. शिवसेना सत्तेत असतानाही गावोगावी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला गेला. पाच वर्षे सत्तेत असूनही गुलामासारखी वागणूक मिळत होती. असे खळबळजनक विधान संजय राऊत यांनी केलं आहे. मोदी-ठाकरे भेटीमुळे राज्य सरकारला आणि शिवसेनेला फायदा होणार होताच परंतु यापुर्वीच राऊतांनी खळबळजनक दावा केल्यामुळे आता भाजपकडून तीव्र प्रहार होण्याची शक्यता आहे.

स्वबळावर निवडणूक जिंकू

- Advertisement -

महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने आगामी निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे वारंवार सांगितले आहे. यानंतर आता शिवसेनेकडूनही स्वबळावर निवडणूक लढण्याबाबत घोषणा केली जात आहे. जळगावमध्ये शिवसेनेचे बळ आहे. महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकळसभा निवडणूक स्वबळावर लढून जिंकू असे संजय राऊत यांनी म्हटलं आहेत. तसेच जळगाव जिल्ह्यात आता खासदार व्हावा अशी आपेक्षा असून ती निश्चित पुर्ण करु असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. जळगावमध्ये शिवसेनेचे महापौर, आमदार झाला आहे यामुळे आता खासदार व्हावा अशी शिवसनेची इच्छा असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पवार-किशोर भेट मोठी उलथापालथ करणार

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि पश्चिम बंगालचे निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीवरही संजय राऊत यांनी वक्तव्य केलं आहे. प्रशांत किशोर हे कोणत्याही पक्षाचे नेते नाहीत. त्यांचे काम वेगळ्या प्रकारचे आहे. त्यांना मुख्यमंत्रीही भेटले आहेत. आम्हीही भेटलो आहे. मागच्या निवडणूकीत त्यांनी शिवसेनेसाठी आणि काँग्रेससाठीही काम केलं आहे. प्रशांत किशोर प्रोफेशनल रणनितीकार आहेत. जर एखाद्या प्रमुख नेत्यांनी त्यांना भेटून चर्चा केली असेल तर ते त्यांच्या पक्ष कार्याविषयी आणि विस्ताराविषयी चर्चा केली असणार यामुळे ही भेट राजकारणत मोठी उलथापालथ करणारी घटना असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -