घरमहाराष्ट्रSanjay Raut : गणपत गायकवाड प्रकरणावरून राऊतांचे भाजपावर गंभीर आरोप, सोमय्यांनाही सुनावले

Sanjay Raut : गणपत गायकवाड प्रकरणावरून राऊतांचे भाजपावर गंभीर आरोप, सोमय्यांनाही सुनावले

Subscribe

नवी दिल्ली : भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी (ता. 02 फेब्रुवारी) रात्री शिवसेना शिंदे गटाचे कल्याणमधील पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. गणपत गायकवाड यांनी केलेले विधान हाच पुरावा असून या पुराव्याच्या अंतर्गत PMLA कायद्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चौकशी होणे गरजेचे आहे, असे संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितले आहे. (Sanjay Raut’s serious allegations against BJP on the Ganpat Gaikwad case)

हेही वाचा… Raut on Shrikant : श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसानिमित्ताने गुंड हेमंत दाभेकरने घेतली भेट; संजय राऊतांची सरकारवर टीका

- Advertisement -

गणपत गायकवाड प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपाने आजवर अनेकांवर कारवाई केली आहे. देशात अनेक कायदे आहेत. परंतु, भाजपाला केवळ Prevention of Money Laundering Act माहीत आहे. PMLA चा  गैरवापर करून भाजपाने आजवर अनेकांना धमकावले आहे. त्यांना आपल्या पक्षात घेतले आहे. त्यामुळे याच मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत आता मुख्यमंत्र्यांवर कारवाई व्हायला हवी. कारण स्वतः भाजपाच्या आमदाराने त्यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप केला आहे, असेही ते म्हणाले.

तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुन्हेगारीचा पैसा स्वीकारला आहे. यासंदर्भात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी वक्तव्य केले आहे. माझे कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, असे गणपत गायकवाड सांगतात. त्यांच्या आरोपानुसार आता त्याचा शोध घेतला पाहिजे. आमच्या माहितीनुसार, हे 100 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांना या प्रकरणात अटक करता येईल, असा दावाही राऊतांकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

प्रसार माध्यमांनी राऊतांकडे याबाबतचा पुरावा मागितला असता ते म्हणाले की, मनी लाँन्ड्रिंग कायद्यानुसार या गुन्ह्यात पुरावा लागत नाही. अशा प्रकरणांमध्ये वक्तव्य महत्त्वाची असतात. या प्रकरणात वक्तव्य आले आहे आणि वक्तव्यच महत्त्वाचे आहे. कारण ईडी या वक्तव्यांच्या आधारावर गुन्हा दाखल करू शकते. आमच्यावर आरोप करतानाही ही वक्तव्येच ग्राह्य धरण्यात आली आहेत. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये ईडी, सीबीआय, आर्थिक गुन्हे शाखा आहेत कुठे? ते फक्त विरोधकांसाठीच आहे का? असे प्रश्नही राऊतांनी उपस्थित केले. एफआयआर झाल्याशिवाय ईडी कोणत्याही प्रकरणात पडत नाही. गणपत गायकवाड प्रकरणात एफआयआर झालेला आहे. त्याच एफआयआरचा वापर करून ईडी कारवाई करू शकते, असा दावा संजय राऊतांनी केला.

हिशोब तर द्यावाच लागेल…

गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेले आरोप हे मनी लाँन्ड्रिंग प्रकरणाशी संबंधित आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा हिशोब तर द्यावाच लागेल, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांची नक्कल केली. त्यांची नक्कल करत राऊत म्हणाले की, भाजपाचा एक पोपटलाल म्हणतो की, हिशोब तर द्यावाच लागेल. मग त्यांनी आता एकनाथ शिंदे यांच्याकडे हिशोब मागावा. तुमच्या पक्षातील गणपत गायकवाडने सांगितले की, माझे त्यांच्याकडे कोट्यावधी रुपये पडले आहेत. मग हिंमत असेल तर त्यांनी वर्षावर जावे आणि हिशोब मागावा. भाजपाने ही बदमाशी बंद करावी, असा हल्लाबोल राऊतांनी किरीट सोमय्यांवर केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -