घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023संजय राऊतांची बजेटवर तिखट प्रतिक्रिया; म्हणाले, सरकार कोसळण्याच्या भीतीने...

संजय राऊतांची बजेटवर तिखट प्रतिक्रिया; म्हणाले, सरकार कोसळण्याच्या भीतीने…

Subscribe

Sanjay Raut Reaction on Budget 2023 | बजेट म्हणजे निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून बनलेले बजेट असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. आज त्यांनी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपावरही जोरदार प्रहार केला.

Sanjay Raut Reaction on Budget 2023 | मुंबई – राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांचं पहिलं बजेट (Maharashtra Budget 2023) काल गुरुवारी सभागृहात मांडलं. यंदाचं बजेट हे पंचामृत ध्येयावर आधारित असून यामाध्यमातून शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, बीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा, पर्यावरणपूरक विकास आदी घटकांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. मात्र, हे बजेट म्हणजे निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून बनलेले बजेट असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. आज त्यांनी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपावरही जोरदार प्रहार केला.

हेही वाचा ‘इलेक्शन बजेट’वर विधानसभेत आज होणार चर्चा, विरोधक-सत्ताधारी पुन्हा भिडणार

- Advertisement -

“सरकार कोसळण्याच्या भीतीने हे बजेट सादर झालंय. कदाचित हे त्यांचं शेवटचं बजेट असेल. सर्वोच्च न्यायालयात ज्याप्रमाणे सुनावणी सुरू आहे त्यामुळे घटनेनुसार निर्णय लागेल. न्यायालयाच्या निकालानंतर १६ आमदार अपात्र ठरतील आणि हे सरकार कोसळेल. त्यामुळे, लोकांमध्ये जाण्यासाठी काही भूमिका हव्यात म्हणून कालचं थापेबाजीचं बजेट सादर केलं. बजेटमध्ये मोठ्या रक्कमा सांगण्यात आल्यात. पण, तिजोरीत पैसे आहेत का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेना नेहमीच शिवरायांच्या विचारावर पावलं टाकत आली आहे. जनतेचा आणि महाराष्ट्राचा विचार शिवसेनेमार्फत केला गेला. शिवरायांनी ज्याप्रमाणे शिवशाही राबवली त्याप्रमाणे शिवसेना प्रत्येक धोरणं ठरवत असते, असं संजय राऊत आज शिवजंयतीनिमित्त म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रातील योजनांना मोदींचे नाव; काँग्रेस म्हणते, देशाची राजेशाहीकडे वाटचाल!

शिवसेना करणार आंदोलन

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. हाहाकार उडालेला आहे. त्यामुळे शिवसेना प्रत्येक तहसील कार्यालयावर जाऊन आंदोलन करणार आहे. तत्काळ पंचनामे करा, मदत करण्यासाठी हे आंदोलन असेल. शेतकऱ्यांना वेळीच मदत मिळाली नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.

मनसेवर प्रहार

मनसेच्या वाटेला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही. मुख्यमंत्रीपद का गेलं हे संपूर्ण जगाला माहती आहे. हे त्यांना अजून माहीत नसेल तर त्यांच्या पक्षाची वाढ झालेली नाही. ईडी, सीबीआय आणि खोक्यांमुळे महाराष्ट्रातील सरकार गेलं.
शिवसेनेने कधीच हिंदुत्त्व सोडलं नाही. कोण काय बोलतं यावर शिवसेनेची भूमिका बदलत नाही, असं म्हणत संजय राऊतांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -