घरमहाराष्ट्रव्हेंटिलेशन नाही, मला गुदमरायला होतंय, राऊतांच्या तक्रारीनंतर कोर्टाचे ईडीला आदेश

व्हेंटिलेशन नाही, मला गुदमरायला होतंय, राऊतांच्या तक्रारीनंतर कोर्टाचे ईडीला आदेश

Subscribe

मुंबईतील गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली, या अटेकनंतर आज पुन्हा एकदा त्यांना ईडीच्या विशेष कोर्टात हजर करणयात आले, यावेळी कोर्टाने संजय राऊतांच्या ईडी कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. मात्र ईडी कोठडीसाठी आपल्याला ज्याठिकाणी ठेवलं आहे तिथे व्हेंटिलेशन नाही, हार्टचा त्रास असल्याने गुदमरायला होतयं, अशी तक्रार संजय राऊतांनी कोर्टात केली. यानंतर कोर्टाने राऊतांची काळजी घ्या, असे आदेश ईडीला दिले आहेत.

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊतांना ईडीने 31 ऑगस्ट रोजी अटक केली, यानंतर कोर्टाने त्यांना 3 दिवसांची ईडी कोठडी सुनावली, आज त्यांच्या कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना विशेष ईडी कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सुनावणीत राऊतांनी ईडी कोठडीतील त्यांच्या अडचणी कोर्टासमोर मांडल्या. त्यामुळे नेमकं सुनावणीत काय झालं जाणून घेऊ…

- Advertisement -

राऊतांच्या तब्येतीवरून कोर्टाचे ईडीला आदेश 

न्यायमूर्ती – ईडी कोठडीत तुम्हाला काही त्रास झाला का?

संजय राऊत – ज्या कोठडीत मला ठेवण्यात आलंय तिथे व्हेंटिलेशन नाही, मला हार्टचा त्रास असल्याने तिथे गुदमरायला होतयं.

- Advertisement -

संजय राऊत – रात्री झोपण्यासाठीच्या ठिकाणी देखील वेंटिलेशन नाही. तिथे फक्त एक छोटा फॅन आहे.

ईडी – राऊतांच्या या अडचणींबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण राऊतांना ठेवण्यात आलेल्या ठिकाणी एसी आहे. ती संपूर्ण इमारतचं एअर कंडिशनर आहे. जर त्यांना एसी नको असेल तर तिथे अनेक रुम आहेत त्याठिकाणी त्यांना ठेवू शकतो.

संजय राऊत – सतत एसीने मला त्रास होतो. त्यामुळे थोडी हवा खेळती राहण्याची सोय तरी हवी ना.

ईडी – संजय राऊत यांन नॉन एसी रुममध्ये व्यवस्था करतो.

न्यायमूर्ती – संजय राऊतांची ईडीने व्यवस्थित काळजी घ्यावी. कारण ते कोठडीत असल्याने त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी ईडीची आहे.

हेही वाचा : पत्राचाळ प्रकरण : संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांचा कोर्टातील युक्तीवाद

१) पत्राचाळ प्रकरणात प्रवीण राऊतांना मिळालेली 112 कोटींच्या रकमेतील काही रक्कम त्यांना रोख स्वरुपात मिळाल. तसेच देशात आणि परदेशात प्रवास करण्यासाठी प्रवीण राऊतांना राऊत परिवाराने पैसा पुरवला आहे.

२) तसेच प्रवीण राऊत दर महिना 2 लाख रुपये संजय राऊतांना देत होता.

३) छापेमारीत जप्त केलेली काही संशयास्पद कागदपत्रे चौकशीदरम्यान संजय राऊतांसमोर सादर केली, यात पैशांच्या व्यवहारासंदर्भात उल्लेख आहे, मात्र राऊत यावर काही बोलण्यास तयार नाहीत.

हेही वाचा : सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज काय होणार? संपूर्ण राज्याचं लक्ष

४) अशी एक व्यक्ती आहे जिला आम्ही चौकशीसाठी बोलावले आहे, मात्र त्या व्यक्तीचे नाव आम्ही इथे घेऊ शकत नाही, त्या व्यक्तीला राऊतांसमोर बसून चौकशी करायची आहे.

५) राऊतांकडून यापूर्वीच्या चौकशीत ज्या आर्थिक व्यवहारांवर बोलण्यास नकार दिला जात होता, त्याच व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे त्यांच्या घरात झडतीदरम्यान सापडली आहेत.

६) यातील काही कागदपत्रांमध्ये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक अकाऊंटमधून काही व्यक्तींना खूप मोठ्या रक्कमेचे ट्रान्सॅक्शन झाले आहेत. ही रक्कम जवळपास 1 कोटी 8 लाख रुपयाच्या घरात आहे. त्यामुळे राऊतांच्या चौकशीसाठी 10 ऑगस्टपर्यंत कोठडी द्यावी.


हेही वाचा : विषय गंभीर, अर्ध्यावर सोडू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना भावनिक आवाहन


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -