राज्यपालांबद्दल बोलताना संजय राऊतांची जीभ पुन्हा घसरली, म्हणाले…

 Sanjay Raut | छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात आम्ही मोहिम उघडली आहे. असं बोलतानाच त्यांनी राज्यपालांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं.

sanjay raut and bhagatsingh koshyari

 Sanjay Raut | मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा एकेरी उल्लेख केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी याबाबत एक व्हिडीओ सादर केला. याबाबत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला. हा संताप व्यक्त करताना त्यांच्या तोंडून शिवराळ भाषा निघाली आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात आम्ही मोहिम उघडली आहे. असं बोलतानाच त्यांनी राज्यपालांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं.

हेही वाचा – महिला आयोगाच्या नोटिशीला चित्रा वाघ यांच्याकडून उत्तर; माझी हरकत…

संजय राऊत म्हणाले की, सरकारमध्ये खुर्च्यांना फेविकॉल लावून बसले आहेत. ते सर्व विषयावर बोलतात पण महाराजांच्या अपमानावर बोलत नाहीत. मला वाटलं होतं एखादा केंद्रीय मंत्री, मायका लाल स्वाभिमानाने उभा राहील आणि राजीनामा देऊन महाराष्ट्रात परतेल. शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानासाठी त्याग केला म्हणून सांगेल. पण सर्व XXX औलाद आहे, असा हल्ला त्यांनी केला.

येत्या १२ जानेवारीपासून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्षाबाबत सुनावणी होणार आहे. केंद्राच्या दबावापोटी राज्यात जे घडवलं, तो डाव उधळला जाईल, असं संजय राऊत म्हणाले. निवडणूक आयोगाच्या सर्व नेमणुका सरकार करतं, तरीही आयोगावर आम्ही विश्वास ठेवतो. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. आतापर्यंत स्वायत्ता आणि स्वातंत्र्य दिसलं नाही. तरीही आम्ही देशातील प्रमुख स्तंभ आहेत, त्यावर विश्वास ठेवतो. न्यायालयावर आमचा प्रचंड विश्वास आहे. अजूनही या देशात संविधान, न्याय आणि कायदा जिवंत आहे असं आम्ही मानतो, असंही संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा आगामी निवडणुका मविआ एकत्र लढवणार का? शरद पवारांचं मोठं वक्तव्य

आम्ही पूर्ण तयारी केली आहे. शिवसेना एकच आहे. एकच राहील. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली होती. त्या सेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. ३०-३५ लोकं सोडून गेले. आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले, त्यांना आम्ही तिकीट दिलं, ते सोडून गेले म्हणजे पक्ष गेला नाही, असा हल्लाबोलही त्यांनी शिंदे गटावर केला.