घरट्रेंडिंगवर्षा राऊत यांना ईडीचं पुन्हा समन्स; 'या' तारखेला हजर राहण्याचे आदेश

वर्षा राऊत यांना ईडीचं पुन्हा समन्स; ‘या’ तारखेला हजर राहण्याचे आदेश

Subscribe

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुन्हा समन्स बजावले असून पुन्हा एकदा त्यांची चौकशई होणार आहे. ईडीने वर्षा राऊत यांना ११ जानेवारीला चोकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी ४ जानेवारीला वर्षा राऊत ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या होत्या. यावेळई ईडीने तब्बल साडेतीन तास चौकशी केली होती.

वर्षा राऊत यांची पीएमसी बँक खात्यातील ५५ लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी ईडी चौकशी करत आहे. याप्रकरणी ईडीने वर्षा राऊत यांना २९ डिसेंबर चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, वर्षा राऊत २९ डिसेंबरला चौकशीसाठी न जाता मुदतवाढ मागून ४ डिसेंबरला हजर झाल्या. यावेळई ईडीने त्यांची साडेतीन-चार तास चौकशी केली. दरम्यान, चौकशी पूर्ण न झाल्याने पुन्हा एकदा ईडीने बोलावलं आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

पीएमसी बँकेतील घोटाळ्याला हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) ही कंपनी जबाबदार आहे. गुरुआशीष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही एचडीआयएलची उप कंपनी आहे. प्रवीण राऊत याच कंपनीत संचालक होते. संचालक असताना त्यांनी एचडीआयएलच्या खात्यातून १.६० कोटी रुपये पत्नी माधुरी यांच्या खात्यात वळवले. माधुरी यांनी याच १.६० कोटी रुपयांपैकी ५५ लाख रुपये वर्षा राऊत यांना व्याजमुक्त कर्ज म्हणून दिले. या सर्व घडामोडी २०१०-११ दरम्यान घडल्या. पुढे एचडीआयएलने पीएमसी बँकेचे ६,६७० कोटी रुपयांचे कर्ज बुडवले. त्यातून पीएमसी बँक कोसळली. याचाच तपास ईडीकडून केला जात आहे.


हेही वाचा – कर्तव्याचा भाग म्हणूनच मालेगाव बॉम्बस्फोट कटाच्या बैठकीला उपस्थित; पुरोहितचा दावा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -