घरलोकसभा २०१९खडाजंगीमाढात पुन्हा ट्विस्ट; भाजपच्या संजय शिंदेंना राष्ट्रवादीचे तिकिट?

माढात पुन्हा ट्विस्ट; भाजपच्या संजय शिंदेंना राष्ट्रवादीचे तिकिट?

Subscribe

माढा लोकसभा मतदारसंघातील नाट्यमय घडामोडींमुळे यंदाची निवडणूक रंगतदार होणार असेच चित्र दिसत आहे. आधी विजयसिंह मोहिते पाटील, मग शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपप्रवेश केला. आता भाजप पुरस्कृत असलेले सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे वृत्त पुढे येत आहे. आज ते बारामती येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा आहे. मोहिते पाटील घराण्याचे कट्टर विरोधक असलेले संजय शिंदे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, असे सांगितले जात आहे.

जाणून घ्या संजय शिंदे यांच्याबद्दल

संजय शिंदे हे सध्या भाजपच्या पाठिंब्यावर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. माढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांचे ते धाकटे बंधू आहेत. २०१४ साली राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करमाळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. नारायण आबा पाटील यांनी ही निवडणूक जिंकली असली तरी संजय शिंदे हे तिसऱ्या क्रमाकांवर होते. टेंभुर्णी या गावातून सरपंचपदापासून त्यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली होती. शिंदे अनेक सहकारी संस्थाचे अध्यक्ष देखील आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -