घरताज्या घडामोडीपवारांनी खुट्टी ठोकली आणि... संजय शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका

पवारांनी खुट्टी ठोकली आणि… संजय शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका

Subscribe

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या थुकपट्टीवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यांच्या या कृतीचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. यावर विरोधी पक्षनेते अजित पवारा यांनी देखील राऊतांवर प्रतिक्रिया दिली होती. महाराष्ट्रात संजय राऊतांनी किंवा कुणीही बोलताना संयम राखला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले होते. परंतु अजित पवारांनी खुट्टी ठोकल्यानंतर तुमची भाषा बदलली, अशी खोचक टीका शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी राऊतांवर केली.

पवारांनी खुट्टी ठोकली आणि… 

अजित पवारांनी काल एक खुट्टी ठोकली आणि तुमची भाषा बदलली. अजित पवारांनी तुम्हाला जी भाषा समजते, त्या भाषेत सांगितलं. तुम्ही मोठे नेते आहात, असं ते म्हणाले. याचा अर्थ असा होता की, तुमच्याबरोबर आता आम्हाला बोलणी करायची नाही. अजित पवारांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली म्हणून तुम्ही तुमचं स्टेटमेंट बदललं, असं संजय शिरसाट म्हणाले.

- Advertisement -

तुम्ही शिवसेना नेस्तनाबूत केली आहे

तुम्हीच सांगितलं की, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आता तुमची जळून राख झाली आहे. त्यामुळे आता तरी तुम्ही सुधरा. दुसऱ्यावर बोलण्यापेक्षा इतर विषयांवर बोला. शेतकऱ्यांच्या विषयांवर बोला. तुम्ही शिवसेना नेस्तनाबूत केली आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.

काय म्हणाले होते संजय राऊत?

शुक्रवारी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार संजय शिरसाट यांचे नाव घेताच थुंकण्याची ॲक्शन केली. त्यांनंतर राज्यातील अनेक राजकारण्यांनी याबाबद्दल संताप व्यक्त केला. तर पक्षाच्या नेत्यांनी तार्तम्य बाळगावे आणि आपले मत व्यक्त करावे, असे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले. अजित पवारांच्या या मताला प्रतित्युत्तर देत संजय राऊत म्हणाले की, धरणामध्ये xxxपेक्षा थुंकणं चांगलं अशी खालच्या पातळीवर टीका केली. त्यामुळे या टीकेवरून या दोघांमध्ये पुन्हा शीतयुद्ध सुरु होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

- Advertisement -

हेही वाचा : “त्याबद्दल मला खेद वाटतो…” अजित पवारांच्या विधानावरून संजय राऊत नरमले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -