Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र शिवसेनेच्या 'या' आमदाराने साधला सुषमा अंधारेंवर निशाणा; म्हणाले, "गौतमी पाटील अन् सुषमा...

शिवसेनेच्या ‘या’ आमदाराने साधला सुषमा अंधारेंवर निशाणा; म्हणाले, “गौतमी पाटील अन् सुषमा अंधारे…”

Subscribe

संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. यावेळी त्यांनी गौतमी पाटील आणि सुषमा अंधारे या दोघीही एक्टर आहेत, असे म्हणत त्यांना लक्ष केले आहे.

सुषमा अंधारे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केल्यापासून त्यांच्यावर शिवसेनेच्या आमदारांकडून निशाणा साधण्यात येत आहे. सुषमा अंधारे आणि संजय शिरसाट यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून शाब्दिक युद्ध सुरू आहे. अंधारे यांच्याविरोधात बोलताना शिरसाटांची जीभ घसरली होती. ज्यानंतर सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांची पोलिसांत तक्रार केली होती. पण अंधारे यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर देखील शिरसाट मात्र त्यांच्यावर टीका करणे कमी करत नसल्याचेच दिसून येत आहे.

हेही वाचा – मध्य रेल्वे मार्गावर मार्च ते एप्रिलपर्यंत 194 मुलांची सुटका

- Advertisement -

संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. यावेळी त्यांनी गौतमी पाटील आणि सुषमा अंधारे या दोघीही एक्टर आहेत, असे म्हणत त्यांना लक्ष केले आहे. गौतमी पाटीलचा सध्या आडनावावरुन वाद सुरू आहे. या वादात उडी घेत सुषमा अंधारे यांनी गौतमीचे समर्थन केले. माधुरी दीक्षितला कोणी आडनाव बदलण्याचे आजपर्यंत नाही म्हटले, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले होते. सुषमा अंधारे यांनी गौतमीचं समर्थन केल्यासंदर्भात आमदार शिरसाट यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना त्यांनी सुषमा अंधारेंवर बोचरी टीका केली.

“गौतमी पाटील आणि सुषमा अंधारे दोन्ही अॅक्टर आहेत, त्यामुळे सपोर्ट केला असेल. या दोन्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील अॅक्टर आहेत. एका एक्टरने दुसऱ्या अॅक्टरला सपोर्ट करणे यात काही गैर नाही. गौतमी पाटील इमानदारीने पोटासाठी कला सादर करते म्हणून तिला वाईट असे मी म्हणणार नाही, ती तिच्या पोटासाठी मेहनतीनं काम करत आहे. वसुली करुन जर कोणी पोट भरत असेल तर गौतमी आणि त्यांच्यातला हा फरक आहे,” असे म्हणत संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली. तसेच, कुणाचा तळतळाट घेऊन, वाभाडे काढून, नावं ठेवून सुषमा अंधारे यांनी त्यांची लोकप्रियता जपली आहे, अशी टीका देखील शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केली आहे.

- Advertisement -

तर, गौतमी पाटील ही मेहनती आहे, ती करत असलेल्या कामातून ते दिसत आहे. आपली कला लोकांसमोर सादर करते व पोट भरते. लोक तिच्या कार्यक्रमाला येतात हेच खऱ्या अर्थाने तिचे यश आहे, मी तिचे अभिनंदन करतो, असे म्हणत आमदार संजय शिरसाट यांनी गौतमी पाटीलचे कौतुक केले आहे.

मार्च महिन्यात संजय शिरसाट सुषमा अंधारे यांच्याविषयी बोलताना म्हणाले होते की, हे माझे भाऊ आहेत. ते माझे भाऊ आहेत. काय काय लफडी केलीत ते तिलाच ठावूक. आम्ही 38 वर्षे शिवसेनेत घालवली. तू आहेस कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तर त्यावेळी त्यांची जीभ देखील घसरली होती. आता तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करता. राजकारणात कधी काहीही घडते. शिरसाट यांच्या या वक्तव्याने वादाला सुरुवात झाली होती.

- Advertisment -