घर महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर संजय शिरसाटांनी साधला निशाणा, म्हणाले...

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय शिरसाटांनी साधला निशाणा, म्हणाले…

Subscribe

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. "भाजपाबरोबर पॅचअप करू शकलो असतो. पण, माझ्या नितिमत्तेत ते बसत नव्हते," असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पंरतु त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी निशाणा साधला आहे.

मुंबई : 2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेना आणि भाजपने 25 वर्षे जुनी मैत्री तोडत राजकारणातील सर्वात मोठा निर्णय घेतला. सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाच्या विचारांना पायदळी तुडवून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप भाजपकडून सतत करण्यात येतो. तर भाजप सत्तेसाठी शब्द न पाळू शकल्याने युती तुटली असा घणाघात शिवसेनेकडून करण्यात येत असतो. त्यातच आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. “भाजपाबरोबर पॅचअप करू शकलो असतो. पण, माझ्या नितिमत्तेत ते बसत नव्हते,” असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पंरतु त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी निशाणा साधला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना संजय शिरसाट यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. (Sanjay Shirsat targeted Uddhav Thackeray’s ‘that’ statement)

हेही वाचा – सुप्रिया सुळेंचा भाजपवर पक्ष फोडण्याचा आरोप, चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले सडेसोड प्रत्युत्तर

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर जाणे, हे शिवसेनाप्रमुखांचे विचार होते का? हे नितिमत्तेत बसते का? काँग्रेस आणि राष्ट्रवादीला निवडणुकीत चोर, दरोडेखोर म्हटले. त्यांच्याबरोबर जाणे ही नितिमत्ता होती का? आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुठे आहे? तुम्ही कुठे आहात? शरद पवारांनी टाकलेली गुगली ही पक्षाला डुबवून गेली, असा घणाघात शिरसाटांनी केला.

तसेच आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, ती कायदेशीर बाब असते, हेच या लोकांना कळत नाही. त्यामुळे पक्षाची अशी गत झाली आहे. प्रत्येक चुकीचा परिणाम ठाकरे गटाला आजही भोगावा लागत आहे. तरीही ते जिद्दी असून, हार मानण्यास तयार नाहीत. आम्ही कायद्याला धरून उत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

- Advertisement -

मी भाजपाशी पॅचअप करु शकलो असतो. पण माझ्या नितीमत्तेत ते बसत नव्हते. 2014 पासून ज्यांनी आपल्याला फसवले त्यांच्याबरोबर कसे जाणार? मी मुख्यमंत्री होतो. माझ्या आमदारांना मला डांबून ठेवता आले असते. पण मनाने फुटलेत त्यांना डांबून काय कराणार? मी त्यांना काय कमी केलेले? मला स्वाभिमान महत्त्वाचा होता. शिवसेनेचे दरारा कायम राखणे महत्त्वाचे होते. म्हणूनच मी तडजोड केली नाही, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आले होते.

- Advertisment -