Homeमहाराष्ट्रSanjay Shirsat : संजय शिरसाटांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवले, शासन निर्णय जारी

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवले, शासन निर्णय जारी

Subscribe

राज्य सरकारच्या नियम आणि संकेतानुसार मंत्रिपदी असलेल्या व्यक्तीने महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे अपेक्षित आहे. मात्र, मंत्रिमंडळात नियुक्ती होऊन महिना उलटून गेला तरी मंत्री शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नव्हता.

मुंबई (प्रेमानंद बच्छाव) : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारने सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी संजय शिरसाट यांची नियुक्ती केली होती. विधानसभेच्या निवडणुकीत यश मिळाल्यानंतर महायुती सरकारने शिरसाट यांच्या खांद्यावर मंत्रिमंडळाची जबाबदारी दिली. ज्यानंतर शिरसाट यांनी सिडकोचे अध्यक्ष पद सोडणे, त्यांची जबाबदारी होती. मात्र, सामाजिक न्याय खात्याचे मंत्रिपद भूषवत असतानाही सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदावरून स्वतःहून पायउतार न झाल्याने राज्य सरकारने अखेर संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटविले आहे. नगरविकास विभागाने गुरुवारी (ता. 16 जानेवारी) यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. (Sanjay Shirsat was removed from the post of Chairman of CIDCO)

राज्य सरकारच्या नियम आणि संकेतानुसार मंत्रिपदी असलेल्या व्यक्तीने महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे अपेक्षित आहे. मात्र, मंत्रिमंडळात नियुक्ती होऊन महिना उलटून गेला तरी मंत्री शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नव्हता. सिडकोचे अध्यक्षपद हे लाभाचे पद असल्याने मंत्री बनल्यावर त्याचा राजीनामा देणे अपेक्षित होते. मात्र, सामाजिक न्याय खात्याची सूत्रे स्वीकारल्यानंतरही संजय शिरसाट यांनी राजीनामा दिला नव्हता. उलट सिडको संचालक मंडळाच्या बैठका घेऊन त्यांनी निर्णयाचा सपाटा लावला होता. ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शिरसाट यांना पदावरून बाजूला करण्याचे निर्देश नगरविकास विभागाला दिले होते.

हेही वाचा… CM Devendra Fadnavis : शासकीय सेवा मोबाइलच्या माध्यमातून मिळणार, फडणवीसांचे निर्देश

या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने आज संजय शिरसाट यांचा सिडको अध्यक्षपदाचा कार्यभार संपुष्टात आणणारा शासन निर्णय जारी केला. सिडकोच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनमधील 202 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारास अनुसरून शिरसाट यांची मंत्री म्हणून नियुक्ती झाली असल्याने त्यांच्याकडे सोपविण्यात आलेला सिडको अध्यक्षपदाचा कार्यभार संपुष्टात आणण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर म्हणजे सप्टेंबर महिन्यात संजय शिरसाट यांना सिडकोचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले होते.

हेही वाचा… Raigad Politics : रायगडमध्ये महायुतीतून राष्ट्रवादी OUT, आमदार खासदारांच्या सत्कारातून तटकरे वजा, थोरवे विरुद्ध तटकरे वाद पेटला