घर महाराष्ट्र अंबादास दानवेंच्या मुलाच्या साखरपुड्यात संजय शिरसाटांची हजेरी; चर्चेला उधाण

अंबादास दानवेंच्या मुलाच्या साखरपुड्यात संजय शिरसाटांची हजेरी; चर्चेला उधाण

Subscribe

छत्रपती संभाजीनगर : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या मुलाच्या साखरपुड्यात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना उपस्थितीत होते. वर्षभरापूर्वी संजय शिरसाट यांनी पक्षासोबत बंडखोरी केल्यानंतर ते शिंदे गटात गेले. यानंतर अंबादास दानवेंनी अनेकदा संजय शिरसाटांवर सडकून टीका केली. पण अंबादास दानवेंच्या मुलाच्या साखरपुड्यातील संजय शिरसाट यांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

शिरसाट शिंदे गटात गेल्यानंतर अंबादास दानवे आणि संजय शिरसाट हे दोन्ही नेते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे. तर छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचे बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमात शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट देखील उपस्थित होती.

- Advertisement -

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षासोबत बंडखोरी करते महायुतीत सामील झाले. ही घटना ताजी असतानाच अंबादास दानवेंच्या मुलांच्या साखरपुड्यात संजय शिरसाटांची हजेरीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेता तर सत्तेत गेल्यानंतर विधानपरिषदेच्या नेत्या सुद्धा महायुतीत सामील तर होणार नाही ना?, अशा सर्व चर्चा सध्या राजकीय वर्तुळता रंगल्या आहेत.

हेही वाचा – ठाणे रुग्णालयातील मृत्यूच्या घटनेवरून अजित पवारांचे थेट मुख्यमंत्र्यांना सवाल

संजय शिरसाट ठाकरे गटात जाणार का?

- Advertisement -

अंबादास दानवे महायुतीत सामील होण्याचा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. पण दुसऱ्या बाजूला अजित पवार हे महायुतीत सामील झाल्यानंतर शिंदे गटात अस्वस्थ झाला आहेत. अजित पवारांमुळे शिंदे गटाच्या आमदारांचे मंत्री पद मिळाले नाही आणि नुकतेच अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराजा रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यृसंदर्भात बैठकीत प्रश्न विचारला. यामुळे शिंदे गटात नाराजीचा सूर आवळला जात आहे. यात आता संजय शिरसाट हे अंबादास दानवेंच्या मुलांच्या साखरपुड्यात दिसल्यानंतर ते पुन्हा ठाकरे गटाच्या वाटेवर आहे का?, अशा देखील चर्चा सुरू झाल्यात. आगामी काळात अंबादास दानवे आणि संजय शिरसाट नेमके कोण्यात गटात जातील किंवा ज्या गटात आहेत, त्यातच राहिली, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

 

- Advertisment -