Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र BMC जागा वाटपाबाबत संजय शिरसाटांचे मोठे विधान, म्हणाले...

BMC जागा वाटपाबाबत संजय शिरसाटांचे मोठे विधान, म्हणाले…

Subscribe

लवकरच महाविकास आघाडी आणि युती जागा वाटपाबाबत चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. पण त्याआधी शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी BMC च्या जागा वाटपाबाबत केलेल्या एका मोठ्या विधानामुळे खळबळ उडाली आहे.

मुंबई महानगरपालिका हा विषय सर्वच राजकारण्यांसाठी आणि राजकीय नेत्यांसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. सध्या तरी मुंबई मनपा निवडणूक नेमकी कधी जाहीर होणार आणि या निवडणुका कधी होणार याबाबत कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही किंवा कोणती माहिती समोर देखील आलेली नाही. तर जागा वाटपाबाबत देखील अद्याप कोणत्याही पक्षाकडून काहीही स्पष्ट असे सांगण्यात आलेले नाही. पण लवकरच महाविकास आघाडी आणि युती जागा वाटपाबाबत चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु त्याआधी शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी BMC च्या जागा वाटपाबाबत केलेल्या एका मोठ्या विधानामुळे खळबळ उडाली आहे.

संजय शिरसाट यांनी आज (ता. 05 जून) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलताना म्हणाले की, 2019 मध्ये भाजपने विधानसभेमध्ये जास्त जागा लढवल्या होत्या आणि त्यांनी आमच्यापेक्षा जास्त जागांवर विजय देखील मिळवला होता. त्यामुळे हे सर्व पाहता आगामी मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांना जास्त जागा देण्यात काही दुमत नाही, असे वक्तव्य यावेळी त्यांच्याकडून करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या या विधानाने मात्र आता एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना पक्षाची सत्ता आहे. सध्या पालिकेचा कारभार हा प्रशासकाच्या हाती आहे, ज्यामुळे निवडणुकांची उत्सुकता ही सगळ्यांनाच लागली आहे. पण आता शिरसाटांनी केलेल्या वक्तव्यामुळे खरंच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप पक्ष सर्वाधिक जागांवर निवडणुका लढवणार का? असा महत्त्वाचा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे.

यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील कडाडून टीका केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला यांना निमंत्रण देण्यात आलेले नव्हते. पण त्यावेळी युवानेते आदित्य ठाकरे हे विदर्भात जाऊन गांधींच्यासोबत काही किलोमीटर चालले, हे त्यांच्या कोणत्या तत्त्वात बसत होते. त्यानंतर त्यांचे विश्वप्रवक्ते हे राहुल गांधी यांना काश्मिरला जाऊन भेटले. तिथे जाऊन मातोश्रीबाबतचा आदर घालवलेला आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.

- Advertisement -

याआधी मातोश्रीवर नेते यायचे. पण आता सिल्व्हर ओकवर जाण्याची तुमच्यावर पाळी का आली? असा सवाल यावेळी संजय शिरसाट यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरेंना घेऊन राऊत सिल्व्हर ओकवर का गेले होते, हे त्यांनी सांगावे. तर संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या सांगण्यावरून शिवसेनेत फूट पाडली, असा आरोपही संजय शिरसाट यांच्याकडून करण्यात आलेला आहे.

तर वज्रमूठ सभेतून यांना यांची लायकी दाखवून देण्यात आलेली आहे. पहिली वज्रमूठ सभा जेव्हा छत्रपती संभाजी नगरमध्ये झाली, तेव्हा त्यावेळी असलेली खूर्ची ही दुसऱ्या सभेच्यावेळी बदलण्यात आली. त्यामुळे त्यांचा असलेला भ्रम हा त्यावेळीस मोडीत निघाला. एकेकाळी राष्ट्रपती पदाचे उमेदवार हे मातोश्रीला येऊन नमन करून जायचे, असे म्हणत शिरसाट यांनी ठाकरे गटावर टीका केली. तर आमची निष्ठा ही

- Advertisment -