घरदेश-विदेश"संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी मारहाण करायची", बागेश्वर बाबांची जीभ घसरली

“संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी मारहाण करायची”, बागेश्वर बाबांची जीभ घसरली

Subscribe

यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्याविषयी अपमानास्पद विधान केलंय. त्यामुळे चमत्कारामुळे चर्चेत आलेल्या बागेश्वर बाबांवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय.

Bageshwar Baba Controversial Statement : बागेश्वर धाममध्ये होत असलेल्या कथित चमत्कारामुळे बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री देशभर चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी अंनिसने दिलेल्या चॅलेंजमुळे महाराष्ट्रातही ते प्रसिद्धीझोतात आले होते. त्यानंतर आता बागेश्वर बाबा पुन्हा एकदा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्याविषयी अपमानास्पद विधान केलंय. त्यामुळे चमत्कारामुळे चर्चेत आलेल्या बागेश्वर बाबांवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय.

संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, अशी मुक्ताफळं बागेश्वर बाबा यांनी उधळली. महाराष्ट्राचे एक महात्मा ज्यांची पत्नी त्यांना रोज मारत होती. त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं, बायकोकडून मार खाता, तुम्हाला लाज वाटत नाही का?, त्यावेळी महाराज म्हणाले. ही तर देवाची कृपा ती मला रोज मारते. जर मला प्रेम करणारे बायको मिळाली असती तर मी देवाचा धावा केला नसता, असं देखील बागेश्वर म्हणाले आहेत. त्यांनी त्यांच्या प्रवचनामध्ये हे विधान केलंय.

- Advertisement -

बागेश्वर बाबांच्या या अपमानास्पद विधानामुळे राज्यभर तीव्र प़डसाद उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बागेश्वर बाबांच्या विधानाचा निषेध केला आहे. बागेश्वर बाबांनी संत तुकाराम यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले असेल, तर ते दाखवणे बंद करा. संत तुकारामांविषयी कुणी काही वादग्रस्त बोलले असेल, तर त्याचा जाहीर निषेध केलाच पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

तसेच भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनीही या प्रकरणी माफीची मागणी केली आहे. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी संत तुकामार यांच्याविषयी बोलताना अत्यंत चुकीचा संदर्भ दिला. त्यांच्या विधानाने केवळ वारकरी संप्रदायाचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान झाला. त्यामुळे बागेश्वर बाबांनी माफी मागावी, असे ते म्हणाले.

- Advertisement -

“देहू मध्ये या आणि…”

बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या या विधानानंतर देहू संस्थाननेही अतिशय तीव्र शब्दात त्यांची कानउघडणी केलीय. “तुकाराम महाराज यांनी अन्नप्राशन केल्याशिवाय त्यांच्या पत्नी जेवण करत नव्हत्या त्यामुळे चुकीचा इतिहास पसरवू नका, तुम्हाला जर खरी माहिती घ्यायची असेल तर देहू मध्ये या आणि तुकाराम महाराजांची माहिती घ्या,” अशा शब्दात देहू संस्थानकडून बागेश्वर बाबांना सुनावण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -