Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करत संतोष दगडेंनी शिरपेचात रोवला मानाचा तुरा

माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करत संतोष दगडेंनी शिरपेचात रोवला मानाचा तुरा

Subscribe

माउंट एव्हरेस्टची चढाई करणे धोकादायक आहे. एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी इतरत्र गिर्यारोहणाचा भरपूर अनुभव; तसेच उत्तम आरोग्याचे प्रमाणपत्र, उपकरणे आणि प्रशिक्षित नेपाळी मार्गदर्शक आवश्यक आहे.

मुंबई | कर्जतचे गिर्यारोहक संतोष दगडे यांनी माउंट एव्हरेस्ट (Mount Everest) हे सर्वोच्च शिखर सर करत शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. माउंड एव्हरेस्ट सर करण्याच्या सात जणांच्या ग्रुपमध्ये दोन भारतीय आहेत. यात संतोष दगडे (Santosh Dagde) यांचे नाव असल्याने देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. गिर्यारोहक संतोष दगडे यांनी माउंट एव्हरेस्ट जाण्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांना ध्वजप्रदान केला. माउंट एव्हरेस्ट या मोहिमेला १ एप्रिलला रवाना झाले होते.

दरम्यान, यापूर्वी संतोष दगडेंनी सह्याद्रीतल्या अनेक मोहिमा, कॅम्प आणि हिमालयातली चंद्रभागा -१३, माऊंट नूनसारखी शिखरे सर केली. आता संतोष दगडेंनी माउंट एव्हरेस्ट सर केले आहे. संतोष दगडेंनी कर्जतमध्ये किमान १०-१२ ट्रेक्स आहेत. संतोष दगडे हे पूर्वी शिवशंभो युवा हायकर्ससारखी संस्था येथे रॅपलिंग, क्लायंबिंगचे कॅम्प घेत असे. कर्जत हे एक ट्रेकर्स पॅरेडाईस म्हणून ओळखले जाते. मुंबईजवळील अनेक गिर्यारोहणाचे प्राथमिक धडे गिरवण्यासाठी येतात.

- Advertisement -

माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संतोष दगडे यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. या मोहिमेसाठी संतोष दगडेंना जवळपास ४५ लाख रुपये खर्च आला होता. यातील अर्धी रक्कम ही संतोष दगडेंनी गोळा केली. परंतु, उर्वरित रकमेसाठी त्यांनी मदतचे आवाहन केले होते. यातून संतोष दगडेंना काही रक्कम जमा झाली.

हेही वाचा – माउंट एव्हरेस्ट मोहीमेसाठी ठाणे- रायगडचे चौघे सज्ज; मुख्यमंत्र्यांनी भारतीय ध्वज देत दिल्या मोहिमेस शुभेच्छा

- Advertisement -

माउंट एव्हरेस्ट ऑक्सिजनची कमी

माउंट एव्हरेस्ट हे हिमालय पर्वत रांगेतील एक उंच आणि उतुंग शिखर आहे. हे चीनच्या स्वायत्त प्रदेश नेपाळ आणि तिबेट यांच्या मध्यभागी ८ हजार ८४९ मीटर म्हणजेच २९ हजार ०३२ फुटांवर आहे. १९व्या शतकात भारताचे माजी सर्वेअर जनरल जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या नावावरून माउंट एव्हरेस्ट असे पर्वताला नाव देण्यात आले. एव्हरेस्टची चढाई करणे धोकादायक आहे. एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी इतरत्र गिर्यारोहणाचा भरपूर अनुभव; तसेच उत्तम आरोग्याचे प्रमाणपत्र, उपकरणे आणि प्रशिक्षित नेपाळी मार्गदर्शक आवश्यक आहे. पर्वतावरील बर्फ आणि बर्फ हिमस्खलनासारखे घातक धोके निर्माण होत असतात. त्याचसोबत खराब हवामानामुळे चढाईचा मर्यादित हंगाम असतो. बहुतेक गिर्यारोहकांना कमी ऑक्सिजन पातळीची सवय नसते. त्यामुळे ते बाटलीबंद ऑक्सिजनवर अवलंबून असतात, ते सोबत आणतात. म्हणूनच एव्हरेस्टवरील ८ हजार मीटर उंचीवरील क्षेत्राला ‘डेथ झोन’ म्हटले जाते.

 

- Advertisment -