Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रWalmik Karad : वाल्मिक कराडला मकोका; बजरंग सोनवणे म्हणाले, मारेकऱ्यांना फाशी झाली...

Walmik Karad : वाल्मिक कराडला मकोका; बजरंग सोनवणे म्हणाले, मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे

Subscribe

पुणे – बीड हत्याकांडातील घटनेत आज मोठी अपडेट समोर आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मास्टरमाईंड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. हत्येच्या गुन्हातही त्याचे नाव घेण्यात आले आहे. एसआयटी आणि सीआयडीच्या या तपासावर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी समाधान व्यक्त केले, त्यासोबतच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी खासदार सोनवणे यांनी केली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडवर मकोका लागल्या बद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, तपासात दोषी आढळल्याने त्याच्यावर मकोका लागला आहे. खुनाचा कट रचण्यामध्ये देखील हे सहभागी आहेत, असं एसआयटीने कोर्टात सांगितला आहे.

वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा आणि मकोका लागल्यानंतर परळीमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. एक प्रकारची शांतता पसरली आहे. बाजारपेठामध्ये एकही दुकान उघडले गेले नाही. तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या आई पारुबाई आणि पत्नी मांजुली कराड यांनी आंदोलन सुरु आहे. तर परळीमध्ये सुरु असलेले आंदोलन हे मूठभर समाजकंटकांचे हे काम आहे. हा उत्स्फूर्त बंद नाही. लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद पुकारलेला नाही. पाच-पन्नास पोरं मोटार सायकलवर फिरवून दबाव देऊन दुकान बंद करत आहेत, असा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केला.

बंद करणाऱ्यांबद्दलचे नियोजन पोलीस करतील

खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, परळी बंदच्या विरोधात पोलीस यंत्रणे नियोजन असेल. पोलीस अधीक्षक जागृतीने काम करत आहेत. दडपशाही करुन असं कोणी बंद करू शकत नाही. मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, मास्टरमाइंड सापडला पाहिजे, अशी आमची सुरुवातीपासून मागणी आहे. आरोपींना पळून जायला कोणी कोणी साथ दिली, कट कोणी रचला, हे सगळं बाहेर आलं पाहिजे, असंही खासदार सोनवणे म्हणाले. लोकांच्या मनात आधी हिंमत नव्हती आता हिंमत आली आहे. लोक आता यांच्या गैरकारभाराबद्दल बोलायला लागले आहेत. एक एक प्रकरण बाहेर येतील. वाल्मिक कराडवर आणखी गुन्हे दाखल होतील आणि त्याचा पाय अधिक खोलात जाईल याचे संकेत खासदार सोनवणे यांनी दिले.

खासदार सोनवणे म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्येतील सगळे आरोपी हे पुण्यातच कसे सापडले, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या दृष्टीनेही पोलीस, एसआयटी आणि सीआयडीने तपास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : Walmik Karad : वाल्मिक कराडवर संक्रांत; हत्याकांड मास्टरमाईंडचा ताबा एसआयटीला मिळाला