Homeक्राइमSantosh Deshmukh Murder Case : मारहाणीत वापरलेले गॅस पाईप, लोखंडी वायर, फायटर...

Santosh Deshmukh Murder Case : मारहाणीत वापरलेले गॅस पाईप, लोखंडी वायर, फायटर पोलिसांकडून जप्त

Subscribe

बीड – सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकणातील आता जवळपास सर्व आरोपींना अटक झाली आहे. त्यासोबतच संतोष देशमुख यांच्या हत्येत वापरण्यात आलेल्या वास्तूही पोलीसांनी जप्त केल्या असल्याची माहिती आहे. 35 फुट गॅस सिलिंडर पाईप, लोखंडी वायर, लोखंडी फायटर आणि लाकडी रॉडने संतोष देशमुख यांना मारहाण झाली असल्याची माहिती होती, हे सर्व शस्त्र जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडात आणि अपहरणानंतर देशमुखांना अमानुष मारहाण झाली, त्यात या शस्त्रांचा वापर झाल्याची माहिती आहे.

संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी हत्येसाठी धारदार शस्त्र, तलवारीसारखे शस्त्र, धारदार चाकू, लोखंडी वायर आणि लोखंडी फायटरचा वापर केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी म्हटले आहे. पोस्टमॉर्टम अहवालानुसार संतोष देशमुख यांच्या शरीरावर 56 वार होते. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष देशमुख यांना मारहाण केली तेव्हा त्याचा व्हिडिओ तयार करण्यात आला. तो व्हिडिओ मिळवण्यात आले आहे. व्हिडिओ कोणाला पाठवण्यात आला याचा तपास पोलीस करत आहेत.

गॅस पाईप, लोखंडी वायरने देशमुखांना अमानुष मारहाण 

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गॅस सिलिंडर पाईप तसेच लोखंडी वायरवर जप्त करण्यात आले आहे. यावर रक्ताचे डाग सापडले आहेत. यासह पोलीसांनी लोखंडी फायटर, लाकडी रॉड, जप्त केले आहे. या शस्त्रांचा वापर संतोष देशमुख यांना अमानुष मारहाणीसाठी करण्यात आला. पोलीसांनी या शस्त्रांसोबतच सहा वाहनांचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, दोन ते तीन मोबाईल फोन आणि एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहे.

पोलिस सूत्रांनी सांगितले की, आरोपींच्या मोबाईल फोनमधून अमानुष मारहणाचा व्हिडिओ मिळवण्यात आला आहे. अतिशय अमानुष मारहाण संतोष देशमुख यांना करण्यात आली. पोस्टमॉर्टम अहवालानुसार संतोष देशमुख यांना शरीरावर एकाच ठिकाणी अनेक वेळा वार करण्यात आले. अतिशय निर्दपणे मारण्यात करण्यात आली.

पोलिस आणि सीआयडीने आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे याआधीही दाखल आहेत. आरोपींचा पूर्वतिहास हा गुन्हेगारी असल्याचे समोर आले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले याला पुण्यातून अटक केली आहे. त्याच्यावर दहा हून अधिक गंभीर गुन्हे आहेत. त्यात हत्या, खंडणी, अपहरण, दंगल, यासारखे गंभीर गुन्हे आहेत.

आरोपी प्रतिक घुले, कृष्णा आंधळे, महेश केदार या तिघांवरही संतोष देशमुख यांच्या हत्येसह आणखी पाच गंभीर गु्न्हे आधीच दाखल आहेत. यामध्ये हत्या, खंडणी, अपहरण यासारखे गुन्हे आहेत. याशिवाय जयराम माणिक चाटे, सुधीर सांगळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेला विष्णू चाटे यांच्यावरही अशाच प्रकारचे गु्न्हे आहेत. अपहरण आणि हत्येचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.

संतोष देशमुख हत्येतील मास्टरमाईंड वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. वाल्मिक कराडवर हत्या, खंडणी, अपहरणसारखे 15 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा : Anjali Damania : संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात सरकारकडून धुळफेक, अंजली दमानियांचा आरोप