Homeताज्या घडामोडीDeshmukh murder case : मस्साजोग ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन; फरार आरोपींना तत्काळ...

Deshmukh murder case : मस्साजोग ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन; फरार आरोपींना तत्काळ अटक करा

Subscribe

बीड – मस्साजोग येथील मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गावातील महिला आणि पुरुषांनी तलावात जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी अजूनही फरार आहेत. सर्व आरोपींना तत्काळ अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे. वाल्मिक कराड हा स्वतःहून पोलीसांसमोर आला आहे, मग पोलीस काय करत आहेत? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे. पोलीस निरीक्षक महाजन यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांकडून 31 डिसेंबर रोजी आंदोलनाचे पत्र पोलिसांना देण्यात आले होते. त्यानंतर तहसिलदार, पोलीस यंत्रणा यांच्याकडून ग्रास्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र ग्रामस्थ आंदोलनाच्या भूमिकेवर आक्रमक आहेत. या आंदोलनात संतोष देशमुख यांचे फोटो हातात घेऊन महिला देखील पाण्यात उतरल्या आहे. जलसमाधी आंदोलनात मृत संतोष देशमुख यांचा मुलगा देखील सहभागी आहे.

हत्या प्रकरणातील तीन आरोपी अजुनही फरार

वाल्मिक कराड हा मंगळवारी पुणे सीआयडी कार्यालयात शरण आला. त्याच्यावर हत्येचा गुन्हा अजुन दाखल झालेला नाही. केजमधील पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागीतल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याच प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. वाल्मिक कराड शरण आला असला तरी आणखी तीन आरोपी अजून फरार आहेत. त्यांना त्वरीत अटक करावे अशी मागणी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे.

वाल्मिक कराड सीआयडीला शरण

बीड येथील पवन ऊर्जा कंपनी अवादा एनर्जी प्रायव्हट लिमिटेड कपंनीच्या अधिकाऱ्यांकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागतिल्याचा आरोप वाल्मिक कराडवर आहे. वाल्मिक कराड काल (31 डिसेंबर) पुणे येथील सीआयडी कार्यालयात शरण आला. सीआयडीने त्याला बीड जिल्ह्यातील केज येथील कोर्टात हजर केले. येथे त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. मात्र धक्कादायक बाब म्हणजे अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या खंडणीच्या तक्रारीत कुठेही दोन कोटींची खंडणी मागतिल्याचा उल्लेख नाही. याबद्दल आश्यर्च व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा : Prakash Ambedkar : कराड प्रकरणी फडणवीस सरकारवर दबाव, त्यांनी बळी पडू नये; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

Edited by – Unmesh Khandale