घरमहाराष्ट्रसंतोष परब हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्गात शिवसेना आक्रमक, मुख्य सूत्रधाराच्या अटकेच्या मागणीसाठी केले आंदोलन

संतोष परब हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्गात शिवसेना आक्रमक, मुख्य सूत्रधाराच्या अटकेच्या मागणीसाठी केले आंदोलन

Subscribe

राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल व कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय मोहीते जिल्ह्यात दाखल

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुक व शिवसैनिकावरील हल्ला प्रकरण जिल्ह्यात चांगलंच तापू लागले आहे. आज शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कणकवली पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी संतोष परब यांच्यावर कणकवलीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील सूत्रधाराला अटक करा अशी मागणी करण्यात आली. तर जिल्हा बँकेचे मतदार बेपत्ता असलेल्या प्रमोद वायंगणकर यांचा शोध घ्या अशी मागणीही करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी तापसी अंमलदार कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांना निवेदन सादर केले. दरम्यान निवेदन सादर करण्यासाठी पोलिस ठाण्याकडे जात असताना शिवसैनिकानी “दादा, मला वाचवा, कॉक …कॉक …अश्या घोषणा दिल्या.

 वैभव नाईक यांनी निवेदनात नेमकं काय म्हटलंय? 

आमदार वैभव यांनी यांनी निवेदनात म्हटले की,  शिवसेना कार्यकर्ते तसेच जिल्हा बँक निवडणुकीतील मतदार संतोष परव यांच्यावर १८ डिसेंबर २०२१ रोजी धारधार चाकूने प्राणघातक हल्ला करून दहा दिवस उलटले तरी सूत्रधाराला अध्याप पोलीस अटक करू शकले नाहीत. हल्ला करणाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर आता नितेश राणेंना फोन करणार असे म्हटल्याचे फिर्यादी संतोष परब यांनी आपल्या जबाबात स्पष्ट सांगितले आहे. असे असूनही आपण आमदार नितेश राणे यांना फक्त चौकशीला बोलावून सोडून दिले आहे. आमदार नितेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र असल्याने नारायण राणे यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन आपली केंद्रात सत्ता असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आपण राजकीय दबावाखाली तपास करत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी याप्रकरणी मुख्य सूत्रधार आमदार नितेश राणे यांना तात्काळ अटक करावी तसेच जिल्हा बैंक मतदार प्रमोद वायगणकर गेल्या आठ दिवसापासून तळेरे येथून बेपत्ता असून त्याचाही तपास पोलीस यंत्रणा करू शकली नाही. वरील दोन्ही घटनेबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे म्हटले आहे.

- Advertisement -

संतोष परब हल्ल्या प्रकरणामुळे कणकवलीत तणावाचे वातावरण निर्माण झालेय. त्यामुळे शहारात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलाय.  नितेश राणे यांच्या अटकेसाठी पोलीस काल रात्रीपासून त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल, कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, डीएसपी दाभाडे आज सकाळी कणकवलीत दाखल झाले आहेत.


Corona Vaccination For Children : देशात १ जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरण नोंदणीला सुरुवात

संतोष परब हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्गात शिवसेना आक्रमक, मुख्य सूत्रधाराच्या अटकेच्या मागणीसाठी केले आंदोलन
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -