घरमहाराष्ट्रसंतोष परब प्रकरणी अटकसत्र सुरू राहिल्यास ...नारायण राणेंचा इशारा

संतोष परब प्रकरणी अटकसत्र सुरू राहिल्यास …नारायण राणेंचा इशारा

Subscribe

कणकवली येथील कार्यकर्त्याच्या हल्ल्याप्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांना गोवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करीत असून सत्तेचा गैरवापर सूड बुद्धीने केला जात असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. तसेच अशा प्रकारचे अटकसत्र सुरू राहील्यास सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा केंद्रीय मंत्री राणे यांनी दिला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुडाळ येथे तातडीने ही पत्रकार परिषद आयोजित केली होती, यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, “जिल्ह्यात पोलिसांनी सरकारच्या दबावाखाली दडपशाही अवलंबली तर आम्ही स्वस्थ बसणार नाही केंद्रात आमची सत्ता आहे. मी सुद्धा मंत्री आहे, महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांनी दडपशाही बंद ठेवून कायद्याचे राज्य करावे असा सल्ला दिला व जिल्ह्यातील चार नगरपंचायती आणि जिल्हा बँक निवडणुकीत भाजपच्या बाजूने विजयाचा कौल मिळणार आहे असे वातावरण झाल्याने जिल्ह्यातील शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडी हतबल झाली आहे, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्ते लोकप्रतिनिधींना सुडाच्या भावनेतून पोलिसांच्या सहाय्याने त्रास देत अटक करण्याचे सत्र ही मंडळी करीत आहेत.”

“कणकवलीतील एका सज्जन कार्यकर्त्याला कोणीतरी मारहाण केली अशी बातमी आली त्यातील आरोपी पकडले तरीसुद्धा आमदार नितेश राणे आणि जिपचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांना वारंवार पोलीस ठाण्यात बोलावून विचारपूस करून अटक करण्याचा संभव जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेकडून दिसत आहे हे सूडाचे व आकसाचे राजकारण आहे. पोलिसांच्या बळाचा वापर करून सत्तेचा दुरुपयोग केला जातो. सिंधुदुर्गातील जनता दडपशाहीला जुमानणार नाही ही निवडणूक भाजपाच जिल्हा बँकेत भाजपचीच सत्ता येणार यात दुमत नाही” असे राणे म्हणाले.

- Advertisement -

“सरकारला जनतेला हे सरकार काही देऊ शकले नाही शेतकरी मजूर कामगारांना काही देऊ शकले नाही दहा वर्ष महाराष्ट्राला मागे नेले कुठलीही कुठलाही संबंध नसताना अशी अटकसत्र सरकारने बंद करावी. पोलीस सरकारचे ऐकून सत्तेचा दुरुपयोग करत आहे तसेच सत्तेचा दुरुपयोग करीत भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात केसेस टाकत आहेत. अटकसत्र थांबल नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढून जिल्ह्यातील बेकायदेशीर धंदे व भ्रष्टाचार उजेडात आणू असा इशाराही नारायण राणे यांनी दिला.

“अक्कल तुमच्या कार्यकर्त्यांना शिकवा”

जिल्हा बँक चालवण्यासाठी अक्कल लागते असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर या वक्तव्याचा समाचार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा चांगलाच घेतला. “संचयी प्रकरणी घोटाळा करणारे महाविकास आघाडीच्या पॅनेलमध्ये आहेत त्यामुळे हा सल्ला त्यांनी आपल्या पॅनेलमधील कार्यकर्त्यांना दिला असावा” असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.


 

संतोष परब प्रकरणी अटकसत्र सुरू राहिल्यास …नारायण राणेंचा इशारा
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -