घरताज्या घडामोडीNitesh Rane: जामिनासाठी नितेश राणेंची मुंबई हायकोर्टात धाव

Nitesh Rane: जामिनासाठी नितेश राणेंची मुंबई हायकोर्टात धाव

Subscribe

सिंधुदुर्ग कोर्टात नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येईल याची आम्हाला अपेक्षा होती म्हणून आम्ही लगेचच हायकोर्टात धाव घेतली. पुढील २-३ दिवसात या प्रकरणी हायकोर्टात सुनावणी होईल असे देखील नितेश राणेंच्या वकिलांनी म्हटले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकी दरम्यान शिवसैनिक संतोष परब (santosh parab case)  यांच्यावर झालेल्या हल्ल्यात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)  यांचा सहभाग असल्याचा आरोप केल्यानंतर नितेश राणेंनी सिंधुदुर्ग हायकोर्टात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता मात्र सिंधुदूर्ग हायकोर्टाकडून नितेश राणेंचा अर्ज फेटाळल्यानंतर आता नितेश राणेंनी मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणेंनी मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल केला असून त्यांच्या जामिन अर्जावर कधी सुनावणी होणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.

नितेश राणे सुप्रीम कोर्टाच्या आदेशांच्या प्रोटेक्शनमध्ये असल्याने त्यांना अटक करण्याचे कोणतेही कारण नाही. परंतु न्यायालय जो काही निर्णय देईल त्या निर्णयाचे नितेश राणे पालन करतील अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. सिंधुदुर्ग कोर्टात नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येईल याची आम्हाला अपेक्षा होती म्हणून आम्ही लगेचच हायकोर्टात धाव घेतली. पुढील २-३ दिवसात या प्रकरणी हायकोर्टात सुनावणी होईल असे देखील नितेश राणेंच्या वकिलांनी म्हटले आहे.

- Advertisement -

निलेश राणे- पोलिसांमध्ये बाचाबाची

आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. नितेश राणे कोर्टातून बाहेर पडल्यानंतर गाडीत जाऊन बसले. भाजप नेते निलेश राणे यांची गाडी पोलिसांनी अडवली. यानंतर पोलीस आणि निलेश राणे यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. माझी गाडी कोणत्या अधिकाराखाली थांबवण्यात आली असा सवाल निलेश राणे यांनी पोलिसांना केला. यावेळी कार्यकर्त्यांनी नितेश राणेंच्या गाडीला घेराव घातला होता. नितेश राणे ज्या गा़डीत बसले होते त्याच गाडीसमोर पोलीस आणि निलेश राणे यांच्यात बाचाबाची झाली. दरम्यान थोडा वेळानंतर नितेश राणे स्वतः गाडीतून पायउतार झाले आणि बाहेर आले. नितेश राणेंच्या वकिलांनी पोलिसांसोबत चर्चा केल्यावर नितेश राणेंना सोडण्यात आले. यादरम्यान न्यायालयासमोर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. Nitesh Rane : नितेश राणेंना धक्का, जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला


हेही वाचा – Nitesh Rane : नितेश राणेंना धक्का, जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -