घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'ड्रेसकोड' बाबत सप्तशृंग गड ग्रामपंचायतीचं ठरलं; मंदिर ट्रस्टला दिलेल्या पत्रात म्हटले...

‘ड्रेसकोड’ बाबत सप्तशृंग गड ग्रामपंचायतीचं ठरलं; मंदिर ट्रस्टला दिलेल्या पत्रात म्हटले…

Subscribe

नाशिक :  गेल्या काही दिवसांपासून सप्तशृंगी देवी मंदिरामध्ये भाविकांसाठी ड्रेसकोडचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. आता लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी देवी मंदिरात सुद्धा ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीत घेण्यात आलेला आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सप्तशृंगी मंदिरातील पावित्र्य जपण्यासाठी भाविकांना ड्रेस कोड लागू व्हावा, त्यासाठी विश्वस्त मंडळातील सदस्यांसह सप्तशृंगगड ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि भाविक सकारात्मक आहे मात्र ट्रस्टकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण अद्याप दिलेले नाही.

ड्रेस कोडमुळे भक्तांमध्ये एकच संभ्रम झालेला दिसून येत आहे. अनेक भाविक हे श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या अंतर्गत कर्मचारी वर्गाचे ड्रेस कोडची चर्चा होत आहे असेच समजत असून श्री भगवतीच्या दर्शना साठी भाविकांना एका विशिष्ट पोषाखात यावे लागणार आहे. याबाबत अनेक भाविक हे संभ्रमात आहेत. सप्तशृंगगडावर ग्रामपंचायतीकडून सोमवारी (दि.29) रोजीच्या मासिक बैठकीत ठराव झाल्याची माहिती सरपंच समेश पवार यांनी दिली तर दुसरीकडे ट्रस्टकडून अद्याप ड्रेस कोडबाबत कोणतेही स्पष्टीकरण मिळालेले नाही, यामुळे भाविकांना अनेक प्रश्न पडलेले दिसून येत आहेत.

- Advertisement -

एकीकडे सप्तशृंगी देवी मंदिरात दर्शनासाठी ड्रेसकोड लागू करावा, अशा आशयाचे पत्र ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे. मात्र सप्तशृंगी देवी ट्रस्टकडून याबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. ड्रेसकोडसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून मंदिर विश्वस्त, ग्रामस्थ, भाविकांशी चर्चा करून ड्रेसकोड लागू करावा की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे भाविकांनी कोणताही संभ्रम बाळगू नये, असे आवाहन श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टकडून करण्यात आले आहे.

साडेतीन शक्तीपिठापैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थन असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गड नाशिकच्या सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवीच्या मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याबाबत सप्तशृंगगड ग्रामपंचायतीने सोमवारी (दि.२९) मासिक बैठकीत ठराव केला आहे. या ठरावात महिलांनी तोकडे कपडे घालून मंदिर परिसरात प्रवेश करू नये, मंदिरात पावित्र्य राखले जावे, असे आवाहन ग्रामपंचायतीने भाविकांना केले आहे. मंगळवारी (दि. ३०) हा ठराव मंदिर संस्थानकडे दिला आहे. ग्रामस्थांसोबतच पुरोहित संघाने देखील ड्रेसकोड लागू करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र सप्तशृंगी देवी संस्थानकडून अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

सप्तशृंगी देवी संस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे म्हणाले की, दरम्यान मंदिर संस्थानकडे ठराव येताच विश्वस्त आणि भाविकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार असून सध्या कुठलाही ड्रेस कोड लागू करण्यात आला नसल्याचं ते म्हणाले आहेत. तर अनेक भाविकांनी ग्रामपंचायतीने ठरावाचे स्वागत केले आहे. त्यामुळे भाविकांनी गोंधळून न जाता सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी यावे, त्याचबरोबर अद्याप ड्रेसकोड संदर्भातील निर्णय घेतला नसल्याने स्थानिक ग्रामस्थ, विश्वस्त, भाविकांशी चर्चा करूनच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे मत देवी संस्थानकडून सांगण्यात आले आहे.

मंदिर प्रशासनाचे म्हणणं काय?

सप्तशृंगी देवी मंदिरात दर्शनासाठी ड्रेसकोड संदर्भात कोणतीही नियमावली तयार करण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत ग्रामपंचायतीने केलेला ठराव आहे, मात्र मंदिर प्रशासनाचा याबाबतचा निर्णय होणे बाकी आहे. त्यामुळे भाविकांनी निसंकोचपणे सप्तशृंगी देवी दर्शनासाठी गडावर यायचं आहे. सप्तशृंगी डावर येणार्‍या भाविकांशी चर्चा करून ड्रेसकोड संदर्भातील निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे भाविकांनी गोंधळून न जाता भावभक्तीने दर्शनाला यायचं असल्याचे आवाहन सप्तशृंगी देवी मंदिराकडून करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीचा ठरावात काय म्हटलंय?

दरम्यान, सप्तशृंगगड ग्रामपंचायतीकडून मंगळवारी विशेष बैठक घेण्यात आली. त्यानुसार सप्तशृंगी देवी मंदिरात ड्रेसकोड लागू करावा की नाही याबाबत बैठक घेण्यात आली. त्याचबरोबर सर्वांच्या संमतीने ड्रेसकोड लागू करण्यात यावा असा ठरावही करण्यात आला. दरम्यान आज हा ठराव मंदिर संस्थानकडे दिला गेला मंदिर संस्थान यावर काय निर्णय घेतं हे बघणं महत्वाचं आहे. आता सप्तशृंगी मंदिरात ड्रेसकोड लागू केल्यास अनेक प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. देशभरातून भाविक भक्त हे सप्तशृंगी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. शहरी भागासह ग्रामीण भागातील भाविकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मंदिर प्रशासन नेमकं काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -