घर महाराष्ट्र Saral Seva Bharati 2023: शासकीय कंत्राटी भर्तीचा GR निघाला; सरकारी नोकरीचं स्वप्न...

Saral Seva Bharati 2023: शासकीय कंत्राटी भर्तीचा GR निघाला; सरकारी नोकरीचं स्वप्न भंगलं?

Subscribe

शासनाने आता सरळ सेवा भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधीचा जीआर सुद्धा काढण्यात आला आहे. त्यामुळे लाखो तरुण-तरुणींना याचा फटका बसणार आहे. सरकारच्या या निर्णयाने सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. तर दुसरीकडे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आता रोजगार मिळणार आहे. यामुळे तब्बल 85 संवर्गातील शासकीय पदं ही कंत्राटी पद्धतीनं थेट भरली जाणार आहेत.

शासनाने आता सरळ सेवा भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधीचा जीआर सुद्धा काढण्यात आला आहे. त्यामुळे लाखो तरुण-तरुणींना याचा फटका बसणार आहे. सरकारच्या या निर्णयाने सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. तर दुसरीकडे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आता रोजगार मिळणार आहे. यामुळे तब्बल 85 संवर्गातील शासकीय पदं ही कंत्राटी पद्धतीनं थेट भरली जाणार आहेत. तब्बल 138 संवर्गातील हजारो शासकीय पदं यापुढे थेट कंत्राटीपद्धतीनेच भरली जाणार असल्याची माहिती आहे. शिपाई ते इंजिनीअरची विविध पदं थेट कंत्राटी पद्धतीनेच भरली जाणार आहेत. यासाठी 9 खासगी कंपन्यांना सरळसेवा पदांच्या भरतीसाठी कंत्राटं दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Saral Seva Bharati 2023 GR released for Govt Contract Recruitment Dream of government job broken )

शासनाकडून रितसर मिळणार कमिशन

कंत्राट मिळणाऱ्या कंपन्यांमध्ये काही सत्ताधारी आमदारांच्या कंपन्यांचाही समावेळ आहे. तर संबंधित कंत्राटी कंपन्यांना शासनाकडून रितसर कमिशन मिळणार आहे. संबंधित खात्याचे मंत्री या कंत्राटी भर्तीवर लक्ष ठेवणार आहेत. तसंच या कंत्राटी शासकीय भर्तीला कोणतंही आरक्षण लागू नसणार आहे. त्यामुळे आधीच राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना, आता सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

138 संवर्गातील पदं कंत्राटी पद्धतीनेच भरली जाणार

- Advertisement -

शासकीय नोकरी आता विसरावी लागणार असल्याचं दिसत आहे. कारण आता सरळ सेवा भरतीमधून कंत्राटी कामगार बनावं लागणार आहे. पूर्वीसुद्धा शासनाने कंत्राटी पद्धतीचा जीआर काढला होता. परंतु त्यावेळी विद्यार्थ्यांच्या दबावामुळे हा जीआर मागे घ्यावा लागला होता. परंतु आता शासनाने या जीआरमधून नऊ कंपन्यांना कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. कुशल पदांसह तब्बल 138 संवर्गातील पदं यापुढे कंत्राटी पद्धतीनेच भरली जाणार आहेत.

कंत्राटी भरतीसाठी निवड झालेल्यांना दरमहा 25 हजार ते 2 लाख 50 हजारांपर्यंत पगार दिला जाणार आहे. कुशल कामगारांच्या 50 रिक्त झागा भरल्या जाणार आहेत. त्यांना देखील 25 हजार ते 60 हजारापर्यंत पगार दिला जाणार आहे.

- Advertisement -

तर अर्धकुशल कामगारांच्या 8 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 30 हजार ते 32 हजार 500 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. अकुशल कामगारांच्या 10 जागा भरल्या जाणार असून यासाठी शिक्षणाची कोणतीही अट नाही. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25 हजार ते 29 हजार 500 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

(हेही वाचा :आमदार रवी राणा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; ठाकरे गटाकडे दाखवले बोट )

- Advertisment -