सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाहीत; मुख्यमंत्र्यांचा भुजबळांच्या वक्तव्याचा समाचार

नाशिक : नाशिक शहरातील तपोवनत सुंदर नारायण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त नाशकात आले असता पत्रकारांशी संवाद साधताना छगन भूजबळ यांनी सरस्वतीच्या फोटो संदर्भात केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतांना कोणी काही म्हंटले म्हणून, कोणाला काही वाटले म्हणून आम्ही काम करणार नाही. लोकांना काय वाटत, लोकांना काय पाहिजे हे डोळ्यासमोर ठेऊन आम्ही काम करू असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल. दोन दिवसापूर्वी मुंबई येथे पार पडलेल्या सत्यशोधक समाजाच्या कार्यक्रमात छगन भूजबळ यांनी शाळेमध्ये सरस्वती, शारदा यांचा फोटो का लावता असा सवाल उपस्थित केला होता. त्यातून मोठ्या वादाला तोंड फुटले होते. या वक्तव्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटल्या होत्या.

दोन दिवसापूर्वी सत्यशोधक समाजाची स्थापनेला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांनी “शाळांमध्ये महात्म ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो लावले पाहिजे. कारण यांनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला परंतु लोक सरस्वती, शारदेचा फोटो लावतात, जीला आम्ही कधी बघितलच नाही तिची पूजा का करावी ?” असे म्हंटले होते. आणि त्यातून मोठा वादंग निर्माण झाला होता. याबाबत समाजतील विविध स्थरातून वेगवेगळ्या टीका झाल्या होत्या. याचबाबत नाशिक येथील तपोवनत उभारण्यात आलेल्या सुंदरनारायण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठान सोहळ्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही खरमरीत टीका केली आहे. “कोणी काही म्हटले, कोणाला काही वाटले म्हणून आम्ही काम करणार नाही, लोकांना काय वाटते, लोक काय म्हणताय त्या अनुषंगाने आम्ही काम करू”  असे बोलून मुख्यमंत्री शिंदे यांनी छगन भूजबळ यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार घेतला.

भुजबळ फार्मचा बंदोबस्त वाढवला 
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरस्वती देवी बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात मोठा वादंग निर्माण झाला आहे. समाजात त्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. हिंदुत्ववादी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. यातून शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यती आता पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे. नाशिक शहरातील छगन भुजबळ यांचे निवासस्थान असलेल्या ‘भुजबळ फार्म’ येथे पोलिस प्रशासनाने बंदोबस्त वाढवला आहे.