भाजपा युवा मोर्चाचे भुजबळ फार्म समोर ‘सरस्वती पूजन’

नाशिक : दोन दिवसापूर्वी मुंबई येथे झालेल्या सत्यशोधक समजाच्या कार्यक्रमाप्रसंगी माजी मुख्यमंत्री छगन भूजबळ यांनी शाळेत सरस्वती देवीचा फोटो लावण्याबाबत वादग्रस्त विधान केल होत. त्यातून राज्यभरात वादंग निर्माण झाल आहे. राज्यभरात विविध स्तरातून याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. बुधवारी (दी.२८) नाशिक दौर्‍यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भूजबळ यांच्या याविधांनावर टीका केली होती. राज्यभरात भाजपा युवा मोर्च्याच्या वतीने भुजबळ यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन येत आहे, त्याच अनुषंगाने नाशिक मध्येही भाजपा युवा मोर्चाच्या वतीने छगन भूजबळ यांचे निवासस्थान असलेल्या ‘भुजबळ फार्म’ येथे सरस्वती देवीच्या प्रतिमेच पूजन करत भुजबळ यांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानाचा निषेध नोंदवला. दरम्यान, ‘त्या’ वतव्यामुळे वादंग निर्माण झालेला असल्यामुळे पोलिस प्रशासनाने भुजबळ फार्म येथे बंदोबस्त वाढवला आहे.

काय होते वक्तव्य ?

दोन दिवसापूर्वी सत्यशोधक समाजाची स्थापनेला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांनी “शाळांमध्ये महात्म ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो लावले पाहिजे. कारण यांनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला परंतु लोक सरस्वती, शारदेचा फोटो लावतात, जीला आम्ही कधी बघितलच नाही तिची पूजा का करावी ?” असे म्हंटले होते.

भुजबळ फार्मचा बंदोबस्त वाढवला 

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरस्वती देवी बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात मोठा वादंग निर्माण झाला आहे. समाजात त्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. हिंदुत्ववादी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. यातून शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यती आता पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे. नाशिक शहरातील छगन भुजबळ यांचे निवासस्थान असलेल्या ‘भुजबळ फार्म’ येथे पोलिस प्रशासनाने बंदोबस्त वाढवला आहे.