मनालीमध्ये ट्रेनिंगसाठी गेलेल्या साताऱ्यातल्या बसचा भीषण अपघात

मनाली येथे प्रशिक्षणासाठी (Training) गेलेल्या साताऱ्यातील बसचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Almost half of accident fatalities in Mumbai involve two-wheelers: Report

देशाच्या अनेक भागांत मागील काही दिवसांपासून सतत अपघातांच्या (accident) मालिका घडत आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. तर काही जण गंभीर जखमी झाले आहे. नुकताच उत्तराखंडच्या उत्तरकाशी परिसरात चारधाम यात्रेला (Chardham Yatra) जाणारी बस दरीत कोसळण्याची घटना घडली. ही घटना ताजी असतनाचा मनाली येथे प्रशिक्षणासाठी (Training) गेलेल्या साताऱ्यातील बसचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्हा परिषदेच्यामार्फत अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूटयांच्या (Atal Bihari Vajpayee Institute) ट्रेनिंग साठी साताऱ्यातून शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्स मधून ५० जण या ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आले होते. रेस्क्यू ऑपरेशनच्या ट्रेनिंगसाठी हे प्रशिक्षार्थी गेले होते. चार आठवड्यांचे ट्रेनिंग संपल्यानंतर माघारी येत परतत असताना दुसऱ्या ट्रॅव्हल्सने साताऱ्यातील ट्रॅव्हल्सला समोरून धडक दिल्याने चालक गंभीररीत्या जखमी झाला आहे

या अपघातात जखमी झालेल्या चालकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच, सर्व ट्रेकर्स टीममधील सदस्य सातार्‍याच्या दिशेने रवाना झाले आहेत. मनाली येथून प्रशिक्षण संपून माघारी येत असताना मंडी परिसरात हा अपघात झाला आहे. या बसमधून एकूण ५० जण प्रशिक्षणासाठी गेले होते.


हेही वाचा – नायजेरियातील चर्चवर अज्ञातांकडून हल्ला; ५० हून अधिक नागरिकांचा मृत्यू