घरताज्या घडामोडीCorona: संपूर्ण सातारा जिल्हा पुन्हा लॉकडाऊन!

Corona: संपूर्ण सातारा जिल्हा पुन्हा लॉकडाऊन!

Subscribe

आता रायगड जिल्ह्यानंतर सातारा जिल्ह्यात देखील संपूर्ण लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. १७ जुलै ते २२ जुलैदरम्यान सातारा जिल्हा बंद असणार आहे. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबत आदेश दिले आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन संपूर्ण सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात निर्णय घेतला आहे.

गुरुवारी १७ जुलै रोजी रात्री १२ वाजल्यापासून लॉकडाऊन लागू होणार असून तो २६ जुलै पर्यंत असणार आहे, अशी माहिती सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेतला. सध्या साताऱ्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जर ही परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करावा लागले, अशी भावना विविध स्तरावरून व्यक्त होत होती. यामुळे याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात गुरुवार पासून कडक लॉकडाऊन असणार आहे. पण यावेळेस त्या त्या परिस्थितीनुसार लॉकडाऊन शिथिल करण्यात येईल, अशी प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पनवेल महापालिका क्षेत्र आणि रायगडमध्ये देखील आणखी १० दिवसांचा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. २४ जुलै मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. रायगड जिल्हा आणि पनवेलमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे लॉकडाऊन वाढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


हेही वाचा – आज औरंगाबाद जिल्ह्यात ६८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -