सातारा: सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात असणाऱ्या वाळणे गावच्या हद्दीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुली शिवसागर जलाशयात बुडाल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर लगेच मुलींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामधील दोन मुलींचा मृत्यू झाला असून एका मुलीवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. (Satara News 3 girls drowned while going swimming The death of both and success in saving one)
या घटनेचे वृत्त असे की, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागातील वाळणे गावात असणाऱ्या शिवसागर जलाशयावर पोहण्यासाठी तीन मुली गेल्या होत्या. या तीन मुली या गेल्या होत्या. या तीन मुली या जलाशयात बुडाल्या. ही घटना ग्रामस्थांना कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी जात तिघींना बाहेर काढले. यातील एकीला जीवंत तर दोघी मुली या बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांना ग्रामस्थांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, यातील दोन मुलींचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. एका मुलीवर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, या मुली रविवारी दुपारी 3 च्या सुमारास शिवसागर जलाशयात पोहण्यासाठी गेल्या. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. यामुळे त्या पाण्यात बुडू लागल्या. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजामुळे ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेत तिघींना पाण्यातून बाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर त्यांनी दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दोघींना मृत घोषित केले तर बचावलेल्या एका मुलीवर उपचार सुरू केले आहे. मृत मुली या अल्पवयीन असून या घटनेमुळे तापोळ्यासह वाळणे आणि वेंगळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे.
(हेही वाचा: LPG Price Rate: मोठा दिलासा! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात )