घरमहाराष्ट्रसोमय्यांना आम्हीच सगळं करायला सांगतो हे फडणवीस, चंद्रकांतदादांनी जाहीर सांगावं; सतेज पाटलांचं...

सोमय्यांना आम्हीच सगळं करायला सांगतो हे फडणवीस, चंद्रकांतदादांनी जाहीर सांगावं; सतेज पाटलांचं टीकास्त्र

Subscribe

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना लक्ष्य केलं असून मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावत सुटले आहेत. यावरुन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. किरीट सोमय्या यांना आम्हीच सगळं करायला सांगतो हे एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीरपणे सांगावं, असं सतेज पाटील म्हणाले.

सतेज पाटील सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. किरीट सोमय्या हे सरकार अस्थिर करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत आहेत. तक्रार दिल्यानंतर पुन्हा शहरात फिरण्याची आवश्यकता काय आहे? तुम्ही फिरताय म्हणजे तुम्ही तिथे पब्लिसिटी स्टंट करताय, अशी टीका सतेज पाटील यांनी केली.

- Advertisement -

ससरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणून त्यांची बदनामी करण्याचं कारस्थान सुरु आहे. सत्य उशिराने बाहेर येतं. परंतु, दरम्यानच्या काळात लोकांमध्ये विनाकारण गैरसमज पसरतो. हा गैरसमज निर्माण व्हावा यासाठीच हे षडयंत्र आहे, असा आरोप सतेज पाटील यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी कुठेतरी उघडपणे सांगितले पाहिजे हे सगळं आम्ही किरीट सोमय्या यांना करायला लावतोय. एकदा त्यांनी समोर येऊन सांगितलं पाहिजे. महाराष्ट्रालाही कळेल की राज्यात सुडबुद्धीचं राजकारण होतंय, असंही सतेज पाटील म्हणाले.

त्यांनी चिथावणीखोर विधाने करू नयेत

सतेज पाटील यांनी किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरही भाष्य केलं. कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मागच्या वेळी १४४ कलम लागू करण्यात आलं होतं. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये अशी अपेक्षा होती. तुम्ही तिथे शांततेत जावं. भडकवणारी किंवा चिथावणीखोर विधाने करू नयेत. जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं काही करू नये अशी आमची आता सुद्धा अपेक्षा आहे, असं सतेज पाटील म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -