Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रSatish Bhosale : आधी वन विभागाने बुलडोझर फिरवला, मग होळी दिवशीच अज्ञातांनी खोक्याचे घर पेटवले, महिलांना मारहाण अन्...

Satish Bhosale : आधी वन विभागाने बुलडोझर फिरवला, मग होळी दिवशीच अज्ञातांनी खोक्याचे घर पेटवले, महिलांना मारहाण अन्…

Subscribe

बीड : सतीश उर्फ खोक्या भोसले घर वनविभागाने पाडून टाकले होते. यानंतर अज्ञातांनी खोक्याचे घर जाळून टाकले आहे. ही घटना होळीच्या रात्रीच घडल्याने खळबळ उडाली. घर पेटवून दिल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.

बीडमध्ये एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यावर खोक्या चर्चेत आला होता. त्याचे एक-एक कारनामे समोर येत होते. यातच खोक्या फरारी झालेला. पण, पोलिसांनी त्याला प्रयागराजमधून ताब्यात घेतले. खोक्याने वन्यप्राण्याची शिकार केल्याचा आरोप करण्यात येत होता. तसेच, खोक्याच्या घरात वन्यप्राण्याची शिकार करण्यासाठी लागणारे साहित्य सुद्धा आढळून आले होते.

खोक्याचे कारनामे कमी नव्हते. खोक्याचे शिरूर कासार गावातील घर वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधल्याचे समोर आले होते. त्यामुळे वन विभागाने त्याच्या घरी नोटीस पाठवली होती. मात्र, कोणतेही उत्तर न आल्याने वन विभागाने कारवाई करत खोक्याचे घर बुलडोझरने पाडले होते. त्यावेळी घरातील जीवनावश्यक वस्तू घराबाहेर आणून ठेवल्या होत्या.

वनविभागाच्या कारवाईनंतर गुरूवारी रात्री अज्ञाताने खोक्याचे पाडलेले घर पेटवून दिले. घराच्या बाजूला चिटकूनच आग लावण्यात आली. यात जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ही आग नियंत्रणात आणली. या ठिकाणी असलेल्या काही महिलांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. महिलांना पोलिसांनी रूग्णालयात दाखल केले आहे.