घरमहाराष्ट्रऔरंगाबाद पदवीधर निवडणुकीत सतीश चव्हाण यांची हॅटट्रिक

औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत सतीश चव्हाण यांची हॅटट्रिक

Subscribe

पुण्यापाठोपाठ औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा भाजपला धक्का

औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी भाजपच्या शिरीष बोराळकर यांना पराभूत करत विजयाची हॅटट्रिक साधली आहे. सतीश चव्हाण यांना तब्बल १ लाख १६ हजार ६३८ मते मिळाली आहेत. तर भाजपच्या शिरीष बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मतांवर समाधान मानावे लागले आहे. सतीश चव्हाण यांनी ५७ हजार ८९५ मतांनी विजय मिळवला आहे. पहिल्या फेरी पासून सतीश चव्हाण यांनी घेतलेली आघाडी पाचव्या फेरीपर्यंत कायम राहिली. महाविकास आघाडीमुळे फायदा झाला आणि मताधिक्य वाढले असे मत विजयी उमेदवार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केले.

पुण्यापाठोपाठ औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने भाजपला धक्का दिला आहे. महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण तर त्यांच्याविरोधात भाजपचे शिरीष बोराळकर निवडणुकीच्या रिंगणात होते. सतीश चव्हाण हे सलग दोन वेळा औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत निवडून आले होते. आता तिसऱ्यांदा सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवला आहे. गेल्यावेळी सतीश चव्हाण यांच्याविरोधात बोराळकरच उभे होते. मात्र तेव्हासुद्धा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यावेळी देखील सतीश चव्हाण यांनी बोराळकर यांना पराभूत केले. यंदाची निवडणूक ही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी रंगली होती. या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण विजयी झाले आहेत. चुरशीच्या लढाईत महाविकास आघाडीने विजय मिळवत भाजपला धक्का दिला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -