ठाणे : ठाणे महानगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष तसेच, महानगरपालिकेचे प्रथम महापौर सतीश प्रधान यांचे रविवारी (29 डिसेंबर) सुमारे दुपारी 2 वाजताच्या सुमारास निधन झाले आहे. ज्येष्ठ शिवसैनिक सतीश प्रधान यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका त्यांनी बजावली होती. लोकसभा, राज्यसभा खासदार आणि महापौर अशी अनेक पदे त्यांनी भूषवली होती. त्यांच्या निधनाने ठाण्यात राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. (Satish Pradhan Thane first mayor Thane Municipal Corporation passes away)
हेही वाचा : NMIA : नवी मुंबई विमानतळाची तारीख ठरली, पहिले प्रवासी विमान लॅंड झाल्यानंतर जल्लोष
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत सतीश प्रधान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी त्यांचे योगदान मोठे होते. त्यांचे निधन म्हणजे ठाणे शहरासाठी तसेच शिवसेनेसाठी मोठी हानी आहे. त्यांनी ठाण्याचे नगराध्यक्षपदासोबतच महापौरपदही भूषवले होते. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. राज्यसभेवर ते दोन वेळा निवडून गेले होते. त्यावेळी त्यांनी संसदेच्या विवीध समित्यांवर काम केले. ठाण्याची नगराध्यक्ष ते राज्यसभेचे खासदार असा सतीश प्रधान यांचा राजकीय प्रवास राहीला आहे. ठाण्याच्या जडणघडणीमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहीले जा.
सतीश प्रधान यांचा जन्म मध्य प्रदेशामधील धार येथे झाला. पण त्यांचे संपूर्ण आयुष्य हे ठाण्याच्या राजकारणात आणि समाजकारणात गेले. संसदेत शिवसेनेच्या गटनेतेपदाचीदेखील भूमिका बजावली आहे. 1980 मध्ये त्यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापना केली होती. तसेच, त्यांनी तत्कालीन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यासोबत त्यांनी ठाण्यात अनेक महत्त्वाची कामे केली आहेत. ठाणे शहरात त्यांनी पहिली महापौर मॅरेथॉन सुरू केली होती. तसेच त्यांच्याकडे स्मार्ट सिटीची दूरदृष्टी होती. मिळालेल्या माहितनुसार, सतीश प्रधान यांची अंत्ययात्रा सोमवारी (30 डिसेंबर) सकाळी 10 वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा कमलेश प्रधान, सून डॉ. मानसी प्रधान, कन्या, जावई आणि दोन नाती असा परिवार आहे.