शनिवार, रविवार नाशिक पूर्ण लॉकडाऊन

this area lockdown for seven days in thane
रस्ते पण निर्मनुष्य दिसले. (छायाचित्र - गणेश कुरकुंडे)

कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने प्रशासनाने जिल्हयात अंशतः लॉकडाऊन घोषित केला आहे. त्याचप्रमाणे आता शनिवार आणि रविवार दोन दिवस जिल्हयातील सर्व बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. मात्र यातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे.

मार्चच्या पहिल्या आठवडयात कोरोना रूग्णसंख्या प्रतीदिन पाचशेने वाढत आहे. मागील २१ दिवसांत कोरोना रूग्णसंख्येत चारपटीने वाढ झाली. त्यामुळे बाधितांच्या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी व गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी शनिवार आणि रविवार पूर्ण बाजारपेठा बंद राहणार आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहणार आहेत. त्यामुळे शनिवार आणि रविवार दोन दिवस नागरिकांना पुन्हा एकदा लॉकडाऊनची अनुभूती येणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. बुधवारपासून शाळा, महाविद्यालये, कोचिंक क्लासेस, आठवडे बाजार बंद करण्यात आले आहे. याशिवाय धार्मिक, राजकीय सभा, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.

शनिवार आणि रविवार दोन दिवस बाजारपेठा बंद करण्याचे आदेशही प्रशासनाने काढले आहेत. त्यानुसार आता दोन दिवस नाशिककरांना घरातच कुटुंबियांसोबत वेळ घालवावा लागणार आहे. विकेंडला खरेदीसाठी तसेच पर्यटनासाठी मोठया प्रमाणावर लोक घराबाहेर पडतात त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवणे कठिण जाते. याकरीता शनिवार आणि रविवार पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी सर्व दुकाने (जीवनावश्यक सोडून) व धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद राहतील असे आदेश पारित करण्यात आलेले आहेत. शनिवारी व रविवारी सुट्टीचा फायदा घेऊन होणारी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने हे निर्देश दिलेले आहेत सर्वांनी मास्क, सॅनेटायझर, शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करावा तसेच सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक जाणे टाळावे असे आवाहन आहे.
– सूरज मांढरे
जिल्हाधिकारी