घरमहाराष्ट्रसत्यजित तांबे यांच्यावर आजच कारवाई; नाना पटोले

सत्यजित तांबे यांच्यावर आजच कारवाई; नाना पटोले

Subscribe

मुंबईः कॉंग्रेसमध्ये बडखोरी करणाऱ्या सत्यजित तांबे यांच्यावर आजच कारवाई केली जाईल, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी सांगितले. तसेच शुभांगी पाटील यांनाही महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे भाजप आता सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेची आचारसंहिता लागू होताच सत्यजित तांबे यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल, असा अंदाज होता. अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी डॉ. सुधीर तांबे हे काँग्रेस पक्षातर्फे अर्ज दाखल करतील, असा संदेशही त्यांनी निकटवर्तियांना दिला होता. जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज सादर करण्याचे नियोजन झालेले असताना ऐनवेळी नाट्यमय घडामोडी घडल्या आणि सत्यजित तांबे यांच्या आग्रहापुढे सुधीर तांबे यांना सपशेल माघार घ्यावी लागली. त्यामुळे पक्षाने सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. सोमवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्याचवेळी सत्यजित तांबे यांच्या निलंबनाची सूचना कॉंग्रेस हायकमांडने केल्याचे सुत्रांनी सांगितले होते. ही कारवाई आजच होणार असल्याचे नाना पटोले यांनी गुरुवारी सांगितले.

- Advertisement -

कॉंग्रेसमधून निलंबनाची टांगती असणाऱ्या सत्यजित तांबे यांनी त्यांच्या डीपी व बायोमधून कॉंग्रेस पक्षाचा उल्लेख काढून टाकला आहे. वारसाने संधी मिळते, परंतु कर्तृत्व सिद्ध करावचं लागतं, असे सत्यजित तांबे यांनी लिहिले होते. त्यामुळे निलंबनाची कारवाई होण्याआधीच सत्यजित तांबे यांनी कॉंग्रेस सोडण्याची तयारी केली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. मात्र सत्यजित तांबे यांना शिक्षक भारतीचे कपिल पाटील यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा दर्शवला आहे. भाजपने मात्र अद्यापही सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिलेला नाही.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३० जानेवारी २०२३ ला मतदान होणार आहे. तर, २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघांसाठी तर नाशिक, अमरावतीमध्ये पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे.

- Advertisement -

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -