घरताज्या घडामोडीसत्यजित तांबे सहा वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित, भाजपात जाण्याची शक्यता?

सत्यजित तांबे सहा वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित, भाजपात जाण्याची शक्यता?

Subscribe

विधान परिषदेतील नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात पक्षाचा आदेश झुगारून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर काँग्रेसकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे आता सत्यजित तांबे भाजपात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जारी केलं आहे. यावेळी नाशिक विभाग पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीत आपण बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. आपले हे कृत्य पक्षशिस्तीचे उल्लंघन करणारे असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून तांबेंवर ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आल्याचं या पत्रात लिहिलं आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीची बैठक पार पडली. त्यानंतर बैठकीतून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले. तसेच या बैठकीनंतर सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील आणि नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. नाशिक मतदारसंघातील घटनांमुळे डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने आधीच निलंबित केले असून सत्यजित तांबेवरही कारवाई केली जाणार, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली होती. त्यानुसार महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर सत्यजित तांबे यांना काँग्रेसकडून निलंबित करण्यात आल्याचं पत्र पाठवण्यात आलं आहे.

शिक्षक भारतीकडून सत्यजीत तांबेंना पाठिंबा

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सत्यजीत तांबे यांना शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेस नेते सुधीर तांबे, सत्यजीत तांबे आणि कपिल पाटील यांच्यात महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर कपिल पाटील यांनी सत्यजीत तांबेंना पाठिंबा दिला. त्यामुळे सत्यजीत तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांनी कपिल पाटील यांचे आभार मानले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुधीर तांबे यांच्यावरही काँग्रेसने कारवाई केली होती. पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्याने काँग्रेस पक्षाने ही कारवाई केल्याचं पत्र जारी केलं होतं. मात्र, त्यांच्यानंतर आता त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांच्यावरही आता काँग्रेसने कारवाई केली असून त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे आता दोघेही पिता-पुत्र भाजपात जाणार का?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.


हेही वाचा : शिक्षक भारतीकडून सत्यजीत तांबेंना पाठिंबा, सुधीर तांबेंनी मानले


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -