Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी अपक्ष उमेदवार असलो तरी अनेक संघटनांचा मला पाठिंबा - सत्यजित तांबे

अपक्ष उमेदवार असलो तरी अनेक संघटनांचा मला पाठिंबा – सत्यजित तांबे

Subscribe

विधान परिषदेतील नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे. सत्यजित तांबे यांनी पक्षाचा आदेश झुगारून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर काँग्रेसकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान, अपक्ष उमेदवार असलो तरी अनेक संघटनांचा मला पाठिंबा असल्याचं अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी म्हटलं आहे.

सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मला पाठिंबा देण्याबाबत जाहीर केल्यानंतर एक अधिकृत पत्रही देण्यात आलं. त्यामुळे मी या संघटनेचे आभार मानतो. टीडीएफच्या पाचही जिल्ह्यांचे सर्व पदाधिकारी धुळे, जळगाव, नंदूरबार, अहमदनगर आणि नाशिकमधील सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो. एनडीएसटी ही संघटना नाशिक जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनीही मला पाठिंबा दिला. त्याबद्दल मी संस्थेचे अध्यक्ष अरूण पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो.

- Advertisement -

टीडीएफसह शिक्षक भारतीने देखील मला पाठिंबा जाहीर केला आहे. अनेक संघटनांनी मला पाठिंबा दिला आहे. मी अपक्ष उमेदवार असलो तरी मला पाठिंबा देण्याचं काम अनेक संस्था आणि संघटनांनी केलं आहे. तसेच राजकीय प्रश्नांचं उत्तर वेळ आल्यावर देईन, असं सत्यजित तांबे म्हणाले.

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय आणि शिक्षक महासंघ, जी ज्युनिअर कॉलजेची महाराष्ट्रातील एकमेव संघटना आहे. त्या संघटनेने देखील मला आज पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे मी संघटनेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचे आभार व्यक्त करतो. ही उमेदवारी आम्ही लढतोय. जरी ही निवडणूक अपक्ष असली तरी या सर्व संघटना आणि विविध संघटनेचे पदाधिकारी मला उमेदवारीसाठी पाठबळ देत आहेत. त्यामुळे मी सर्व शिक्षक संघटनांचे आभार व्यक्त करतो. शिक्षकांचे प्रश्न मांडण्याचे काम मागील १५ वर्षात केलंय. त्यामुळे तेच काम मी पुढे करत राहणार आणि नाशिक विभागातील पदवीधारांना न्याय देण्याचे काम मी करणार असल्याचं सत्यजित तांबे म्हणाले.


- Advertisement -

हेही वाचा : सत्यजित तांबे सहा वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित, भाजपात जाण्याची शक्यता?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -