घरमहाराष्ट्रनाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांचा दणदणीत विजय

नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांचा दणदणीत विजय

Subscribe

क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणार्‍या या निवडणुकीत सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गुरुवारी रात्री अधिकृत निकाल जाहीर केला

नाशिक ः नाशिक पदवीधर निवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत अखेर सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला आहे. सत्यजित तांबे यांना 68 हजार 999 मतं मिळाली असून, 29 हजार 465 मतांच्या फरकानं त्यांनी शुभांगी पाटील यांचा पराभव केला आहे. शुभांगी भास्कर पाटील यांना 39,534 मतं मिळाली आहे. प्रभावी प्रचार यंत्रणा, वैयक्तिक जनसंपर्क आणि गेल्या काही महिन्यांपासून केलेल्या सूक्ष्म नियोजनामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी 68 हजारांहून अधिक मते घेत दणदणीत विजय मिळविला.

क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणार्‍या या निवडणुकीत सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गुरुवारी रात्री अधिकृत निकाल जाहीर केला. रात्री १० वाजता सत्यजित तांबे यांचे मतमोजणी केंद्रावर आगमन होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील या दोघांमध्ये चुरशीची लढत दिसून आली. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. महाविकास आघाडीच्या या निर्णयानंतर भाजप सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार का, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती, मात्र भाजपने शेवटपर्यंत आपली भूमिका जाहीर केली नाही.

- Advertisement -

असे असले तरीही भाजपने तांबे यांना छुपा पाठिंबा दिला. त्यामुळे अपक्ष असूनही तांबेंना इतर पक्षांकडूनही मदत झाल्याने तांबेंनी मैदान मारले. नाशिक पदवीधर निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. सकाळपासूनच तांबे समर्थकांनी मतमोजणी केंद्रावर गर्दी केल्याचे दिसून आले. तांबे समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष साजरा केला. रात्री १० वाजता सत्यजित तांबे यांचे मतमोजणी केंद्रावर आगमन होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करीत विजयी जल्लोष साजरा केला. अखेर सत्यजित तांबेंनी विजयी गुलाल उधळला आहे.


हेही वाचाः 

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -