प्रेमासाठी काय पण, कोल्हापूरच्या रांगड्या सौरभचे 50 फुट प्रपोज पोस्टर

Saurabh of Kolhapur proposed prosperity in a unique way
Saurabh of Kolhapur proposed prosperity in a unique way

मुलं-मुली प्रपोज करण्यासाठी काय करतील याचा नेम नाही. आतापर्यंत कधी विमानातून, तर कधी बोटीवर अनेकांनी लग्नासाठी प्रपोज केल्याचे आपण ऐकले आहे. असाच एक प्रकार कोल्हापुरात घडला आहे. एका तरूणाने भल्या मोठ्या होर्डिंगचा वापर करून मुलीला लग्नासाठी प्रपोज केले आहे. पाहूया काय आहे ही घटना…

कोल्हापुरातील सौरभ आणि सांगलीची उत्कर्षा हे दोघे बुधगाव (सांगली) येथील वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये शिक्षण घेत होते. यावेळी सौरभ आणि उत्कर्षाची शेवटच्या वर्षापर्यंत एकमेकांशी खास ओळख नव्हती. मात्र, शिक्षण पूर्ण झाले तेव्हा सौरभच्या घरच्यांनी कोणी असेल तर सांग आम्ही रितसर मागणी घालू असे विचारले. यानंतर सौरभने लगेच माझ्या कॉलेजमधील उत्कर्षा नावाची मुलगी आहे, असे घरी सांगितले यांनतर सौरभच्या वडिलांनी उत्कर्षाला मागणी घातली.

उत्कर्षाच्या घरी सुद्धा होय नाही सुरू होते. उत्कर्षाकडून ही होकार आला नव्हता. अनेक प्रयत्नानंतर उत्कर्षाच्या घरचे तयार झाले. यांनतर सौरभने उत्कर्षाला अनोख्या पद्धतीने प्रपोज करायचे ठरवले. यानंतर त्याने सांगली-कोल्हापूर रोडवर एका 50X25 आकाराच्या होर्डिंगवर उत्कर्षा मॅरी मी – सौरभ एवढेच लिहून प्रपोज केले. प्रपोज केल्यानंतर मुलगी सुद्धा लग्नासाठी तयार झाली आणि या होर्डिंग समोर येऊन दोघांनी एकत्र फोटो सुद्धा काढला. या अनोख्या प्रपोजची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे.

दोघांच्याही घरचे तयार झाले आहेत. शिवाय येत्या 27 मे रोजी दोघांचे लग्न सुद्धा ठरवले आहे. त्यामुळे आम्ही दोघेही आनंदी असून आगळ्या वेगळ्या प्रकारे प्रपोज करून लग्न होत असल्याचा शिवाय कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यात याची चर्चा सुरू असल्याचाही आनंद होत असल्याचे दोघांनी म्हटले आहे.