घरताज्या घडामोडी'या' 5 मुद्द्यांमुळे राहुल गांधींना महाराष्ट्रात धोक्याचे ठरू शकते सावरकरांवरील राजकारण; जाणून...

‘या’ 5 मुद्द्यांमुळे राहुल गांधींना महाराष्ट्रात धोक्याचे ठरू शकते सावरकरांवरील राजकारण; जाणून घ्या

Subscribe

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या सततच्या वक्तव्यांमुळे देशातील राजकारण तापले आहे. एकीकडे भाजपा आक्रमक झाला आहे तर, दुसरीकडे महाराष्ट्रातील काँग्रेसचा मित्रपक्ष असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे नाराज आहेत. वारंवार सावरकरांवर होत असलेल्या अपमानामुळे उद्धव ठाकरे यांनी तर काँग्रेससोबतची युती तोडण्याचा इशारा देत सावरकरांचा होणारा अपमान खपवून घेतला जाणार नसल्याचेही सांगितल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीला देखील शिवसेना उद्धव ठाकरे गट उपस्थित राहिला नाही. दरम्यान, राहुल गांधींनी सावरकरांना लक्ष्य का केलंय, त्यांना कोणता राजकीय संदेश द्यायचा आहे आणि उद्धव ठाकरे या मुद्द्यावर काँग्रेसपासून स्वत:ला दूर का ठेवतात, हे आपण पुढील पाच मुद्द्यांतून जाणून घेऊयात…

नुकताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यानंतर शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांना खासदारकी रद्द करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तसेच, राहुल गांधींनी माफी मागितली असती असे लोक म्हणतात तर यावर राहुल गांधींना काय वाटेल असाही सवाल विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधींनी उत्तर देताना सांगितले की, ‘माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे. गांधी कोणाची माफी मागत नाहीत. राहुल गांधी हे पहिल्यांदा बोलले नव्हते, तर यापूर्वीही अनेकदा बोलले आहेत आणि अनेकदा सावरकरांवर निशाणा साधला आहे’.

- Advertisement -

1. सावरकरांच्या अपमानावरून उद्धव ठाकरे काँग्रेसला लांब का ठेवतात?

देश, संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही काँग्रेससोबत लढत आहोत. परंतु, राहुल गांधींनी सावरकरांबद्दल आक्षेपार्ह बोलणे थांबवावे पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी रविवारी मालेगाव येथे झालेल्या सभेत सांगितले. तसेच, राहुल यांनी भविष्यातही बोलणे टाळावे. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेले वक्तव्य शिवसेनेतील उद्धव गटात खळबळ उडवून देणारे आहे.

- Advertisement -

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांसाठी डिनर पार्टीचे आयोजन केले होते, मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने या डिनर पार्टीवर बहिष्कार टाकला आहे. या डिनर पार्टीला शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील कोणताही नेता उपस्थित नव्हता. एकंदरीत शिवसेनेच्या उद्धव गटाने यापुढे राहुल गांधींचे सावरकरांबाबत केलेले वक्तव्य खपवून घेणार नाही आणि काँग्रेससोबतची युती तोडावी लागली तरी मागे हटणार नाही, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेनेने सावरकरांना महान मानले. त्यांच्यावर होणारी टीका कधीच खपवून घेतली नाही. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात सावरकरांचा राजकीय आलेख चांगला आहे. त्यांची स्वतःची लोकप्रियता आहे.

संपूर्ण मराठी समाज असलेल्या महाराष्ट्रात मतदार म्हणून चित्पावन ब्राह्मणांची संख्या मोठी आहे. त्यांना लहानपणापासूनच पाठ्यपुस्तकात वीर सावरकरांच्या कथा शिकवल्या जातात. घरोघरी त्याचे पठण केले जाते. महाराष्ट्रातील लोकांच्या मनात लहानपणापासूनच एक मानसिक प्रभाव आहे. यामुळेच महाराष्ट्राच्या निवडणुकीदरम्यान भाजपने आपल्या जाहीरनाम्यात त्यांना ‘भारतरत्न’ देण्याची चर्चा केली होती. तसेच, शिवसेनेनेही अनेकदा ही मागणी लावून धरली आहे.

2. स्वातंत्र्य चळवळीतील सावरकरांचा सहभाग आणि माफी

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधी यांचा देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मोलाचा वाटा होता. परंतु, दोघांमध्ये कधीही विचारधारेचा मेळ नव्हता. महात्मा गांधी आयुष्यभर अहिंसा आणि सत्यावर भर देत राहिले. तर सावरकरांनी टोकाच्या क्रांतीचे समर्थन केले. 1910 मध्ये नाशिकच्या ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनची हत्या झाली. ‘अभिनव भारत’ या संघटनेचे लोक या हत्येला जबाबदार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. सावरकरांनी अभिनव भारत संस्था स्थापन केली होती. पण जॅक्सनची हत्या झाली तेव्हा सावरकर लंडनमध्ये होते. त्यांचा मोठा भाऊ गणेश यांना भारतात अटक करण्यात आली आणि सावरकरांना लंडनमध्ये अटक करण्यात आली.

ज्या पिस्तूलने जॅक्सनला मारण्यात आले ते पिस्तूल सावरकरांनी लंडनहून त्यांचा भाऊ गणेशला पाठवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. ज्याने जॅक्सनवर गोळीबार केला, त्याचे नाव कान्हेरे. त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान, सावरकरांना भारतात आणून खटला चालवला गेला. खून आणि देशद्रोहाच्या नावाखाली प्रत्येकी 25 वर्षांची दोन शिक्षा अंदमानमध्ये ठोठावण्यात आली. याला ‘काळ्या पाण्याची’ शिक्षा म्हणतात.

अंदमानच्या सेल्युलर जेलच्या कागदपत्रांनुसार सावरकरांनी एकदा नव्हे तर, सहा वेळा दयेचा अर्ज दिला होता. सावरकर 9 वर्षे 10 महिने तुरुंगात होते. ब्रिटिश सरकार वेळोवेळी राजकीय कैद्यांना सोडत असे आणि कैद्यांकडून प्रार्थनापत्रे मागवत असे. यामुळे सावरकरांनी दयेच्या अर्जासाठी सहा माफीनामा लिहिला. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष सावरकरांना आपला आदर्श पुरुष, खरे देशभक्त, राष्ट्रपुरुष आणि देशाचे स्वातंत्र्यसैनिक मानतात. त्याचवेळी, स्वातंत्र्य चळवळीत सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याबद्दल काँग्रेस अनेकदा भाजपच्या राष्ट्रवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. राहुल गांधी आपल्या विधानांनी सावरकरांना माफी मागणारा नेता म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत राहतात.

3. राहुल गांधींनी सावरकरांवर किती वेळा केला हल्ला?

14 डिसेंबर 2019 रोजी रामलीला मैदानावर झालेल्या ‘भारत बचाओ रॅली’मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रथमच सावरकरांच्या माध्यमातून भाजपवर अतिशय आक्रमक हल्ला केला. ‘रेप इन इंडिया’ या विधानासाठी भाजपने माफी मागावी या मागणीवर झारखंडमधील रॅलीत राहुल गांधी ‘ये लोग कहते है माफी माँगो’ असे म्हणाले होते. माझे नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. सत्य बोलल्याबद्दल मी कधीही माफी मागणार नाही. मी मरेन, पण माफी मागणार नाही. यानंतर राहुल गांधी अनेकदा सावरकरांवर हल्लाबोल करतात.

नोव्हेंबर 2022 मध्ये, भारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधींनी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात आयोजित सभेत सावरकरांबद्दल भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला. त्यावेळी ते म्हणाले होते की, एकीकडे ब्रिटिशांसमोर न झुकणारे बिरसा मुंडासारखे महान व्यक्तिमत्त्व आहे आणि दुसरीकडे इंग्रजांची माफी मागणारे सावरकर आहेत. सावरकर दोन ते तीन वर्षे अंदमानात बंदिस्त होते, म्हणून त्यांनी पत्रे लिहायला सुरुवात केली की आम्हाला माफ करा, तुम्हाला जे हवे ते घ्या, मला तुरुंगातून बाहेर काढा.

राहुल यांच्या वक्तव्यावर सावरकरांचे नातू रणजीत यांनी राहुल गांधींविरोधात मुंबईच्या शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. एक पत्र सादर करताना राहुल गांधींनी ते सावरकरांनी लिहिलेले असल्याचा दावाही केला. राहुल गांधी म्हणाले होते, ‘माझ्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज आहे. हे सावरकरजींनी इंग्रजांसाठी लिहिलेले पत्र आहे. ज्याची शेवटची ओळ आहे- सर, मला तुमचे सेवक व्हायचे आहे. वि डी सावरकर. राहुल म्हणाला, ‘हे मी लिहिलेले नाही. सावरकरांनी लिहिले आहे. तुम्ही हे वाचा, बघा. बघायचं असेल तर बघा पण. याबाबत मी अगदी स्पष्ट आहे. तुरुंगात असताना सावरकरांनी इंग्रजांना मदत केली होती आणि महात्मा गांधी आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांचा विश्वासघात केला होता.

4. राहुल गांधींची सावरकरांवरील टीका काय संदेश देते?

स्वातंत्र्य चळवळीत संघ विचारसरणीच्या नेत्यांचे कोणतेही योगदान नव्हते. सावरकरांनी माफी मागून स्वातंत्र्यसैनिकांचा विश्वासघात केला आहे. हेच राहुल गांधी सावरकरांवर ज्या पद्धतीने हल्लाबोल करत आहेत, त्यातून दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस पक्ष हा महात्मा गांधींच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष असून सावरकरांच्या विचारधारेवर चालणाऱ्या लोकांनी गांधींची हत्या केली, असेही सांगण्याचा प्रयत्न केला जातो.

भाजप आणि शिवसेनेतील उद्धव गट सावरकरांचे वर्णन महान स्वातंत्र्यसैनिक म्हणून करतो, तर काँग्रेस आणि राहुल गांधी सावरकरांच्या भूमिकेवर शंका आणि प्रश्न उपस्थित करत आहेत. या बहाण्याने राहुल भाजप आणि आरएसएसच्या राष्ट्रवादाला गोत्यात उभे करतात.

5. सावरकरांवरील हे राजकारण महाराष्ट्रात ठरू शकते धोक्याचे?

महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांची राजकीय मजबुरी आहे की त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा बचाव केला. मात्र, सावरकरांचा मुद्दा विनाकारण उकरून काढला जाऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. कारण शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे पक्षातील अनेक नेत्यांचा बचाव करू शकत नाहीत. सावरकरांच्या विरोधात विधाने करून महाराष्ट्रातील राजकीय हित साधता येणार नाही. मात्र असे असले तरी, महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे की, आमची शिवसेनेसोबत असलेली महाविकास आघाडी वैचारिक आधारावर नव्हती. आम्ही दोन भिन्न विचारधारा असलेला पक्ष आहोत. आमची युती एका समान किमान कार्यक्रमांतर्गत स्थापन करण्यात आली होती, ज्यामध्ये आम्ही जनहिताच्या मुद्द्यांवर लढण्यासाठी आणि भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी एकत्र आलो. सावरकरांबाबत काँग्रेसची विचारधारा नवीन नाही, असेही ते म्हणाले. आम्ही कोणतीही नवीन भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव गटालाही बघ्याची भूमिका घ्यावी लागली.

राहुल गांधी वारंवार सावरकरांवर निशाणा साधत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस-शिवसेना युतीही धोक्यात आली आहे. राहुल गांधींनी सावरकरांबद्दलचे वक्तव्य करणे थांबवले नाही तर एकत्र राहणे कठीण होईल, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट म्हटले आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी शिवसेना नेत्यांच्या या सल्ल्या किती गांभीर्याने घेतात, हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -