Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी राज्यभरात 'सावरकर गौरव यात्रा' काढणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

राज्यभरात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Subscribe

मी राहुल गांधी यांचा धिक्कार करतो. जनतेमध्ये या प्रकरणी तीव्र असंतोष आहे. म्हणूनच शिवसेना आणि भाजपा मिळून संपूर्ण राज्यभर सावरकर गौरव यात्रा आयोजित करत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मी राहुल गांधी यांचा धिक्कार करतो. जनतेमध्ये या प्रकरणी तीव्र असंतोष आहे. म्हणूनच शिवसेना आणि भाजपा मिळून संपूर्ण राज्यभर सावरकर गौरव यात्रा आयोजित करत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Savarkar Gaurav Yatra will be held across the state Announcement of Chief Minister Eknath Shinde)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ‘मी राहुल गांधी यांचा धिक्कार करतो. जनतेमध्ये या प्रकरणी तीव्र असंतोष आहे’ असे सांगत “शिवसेना आणि भाजपा मिळून संपूर्ण राज्यभर सावरकर गौरव यात्रा आयोजित करत आहोत”, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

- Advertisement -

“सावरकर यांच्या त्यागासाठी आणि देशभक्तीसाठी राज्यभरात, प्रत्येक जिल्ह्यात, विधानसभा क्षेत्रात ही यात्रा आम्ही नेणार आहोत. राहुल गांधी यांनी सावरकरांचा जो वारंवार अपमान केला आहे, त्याचा आम्ही या यात्रेतून निषेध करू”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

- Advertisement -

”सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही असे बोलणारे नेते विधानसभेच्या अधिवेशनामध्ये गप्प होते. कशासाठी तर राजकारणासाठी. महाविकास आघाडीसाठी याच्यापेक्षा दुसरे काय दुर्दैव असू शकते. कालच्या जाहीर सभेमध्ये सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही म्हणजे काय करणार? बाळासाहेबांनी तेव्हा सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणीशंकर अय्यरच्या थोबाडीत दिली होती. ही हिम्मत तुम्ही दाखवणार का? राहुल गांधींच्या थोबाडात देणार का? असा सवालही यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केला.

दरम्यान, या पत्रकार परिषदेनंतर अगदी जाता जाता मुख्यमंत्री शिंदेंनी एक फोटोही माध्यमांना दाखवला. यामध्ये बाळासाहेब ठाकरे मणिशंकर अय्यर यांच्या मास्क लावलेल्या पुतळ्याला चपलेने मारताना दिसत आहे. शिंदेंनी अगदी जाता जाता दाखवलेला फोटो वर दिला आहे.


हेही वाचा – राहुल गांधींच्या थोबाडीत देण्याची हिंमत आहे का? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

- Advertisment -